Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

देशाच्या पर्यटन विकासासाठी 'बीच डेस्टिनेशन सर्किट' विकसित करण्यात आले: श्रीपाद नाईक

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील पर्यटनाच्या विकासासाठी चार संकल्पनांवर आधारित बीच डेस्टिनेशन सर्किट विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

मुंबईत आज पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी बीच डेस्टिनेशन सर्किटविषयी नाईक म्हणाले, यात गुजरात धार्मिक यात्रा, पश्चिम किनारा पर्यटन, सांस्कृतिक आणि निसर्ग सौंदर्य पर्यटन, दक्षिण किनारा, आयुर्वेदिक आरोग्य पर्यटन आणि पूर्व किनारा, वारसा पर्यटन विकसित केले आहे. त्याद्वारे क्रूझ पर्यटनाची मागणी वाढण्यास मदत होईल. किनारी भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीपस्तंभ आणि बेट विकास यासारखे उपक्रमही राबवले जात आहेत.

भारतातील क्रूझ पर्यटन व्यवसायात दशकभरात 10 पट वाढीची क्षमता आहे. या क्षेत्रात सध्या मागणी वाढत असून ते उत्पन्नाचे मोठे साधन ठरू शकेल, असे मत केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने या क्षेत्राची क्षमता ओळखली असून, या क्षेत्रात भारताला प्रथम क्रमांकावर नेण्याचा निश्चय केला असल्याचेही ते म्हणाले.

रासायनिक धक्क्याची पायाभरणी

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि श्रीपाद नाईक यांनी एलपीजीसह रसायने हाताळण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाच्या पीर पाऊ जेटी येथे तिसऱ्या रासायनिक धक्क्याची पायाभरणी केली. या धक्क्याची क्षमता वार्षिक 2 दशलक्ष टन असेल आणि 72,500 टन इतक्या प्रचंड क्षमतेची मोठी गॅस वाहू जहाजे आणि टँकरची हाताळणी होऊ शकेल.

सल्लागार मंडळाची स्थापना

केंद्र सरकारने क्रूझ पर्यटन विकास आणि प्रोत्साहनासाठी एक कृती दल स्थापन केले आहे. जहाजबांधणी आणि पर्यटन विभागांचे सचिव या कृती दलाचे नेतृत्व करतील. त्याशिवाय एक उच्चस्तरीय सल्लागार समितीही नेमण्याची घोषणा सोनोवाल यांनी केली. या समितीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ यांचा समावेश असेल.

गोव्यातही पायाभूत सुविधांचा विकास : देशातील सात प्रमुख बंदरांचा दर्जा सुधारणा आणि आधुनिकीकरण केले जात असून यात मुंबईत उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचा समावेश आहे. यासाठी सुमारे 495 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बीपीएक्स -इंदिरा गोदी येथे उभारण्यात येणारे सागरी क्रूझ टर्मिनल, जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. वार्षिक 200 जहाजे आणि 10 लाख प्रवासी हाताळण्याची या टर्मिनलची क्षमता असेल. गोवा, न्यू मंगळूर, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता येथे अशाच प्रकारे पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

SCROLL FOR NEXT