Minister Govind Gawde, MLA Ravi Naik, Sudesh Bhingi, Sagar Naik Mule, Saish Panandikar and Vignesh Naik after unveiling the natural color work of Sagar Naik Mule. Goa, 13 August2021. Gomantak
गोवा

Goa : कलेच्या संवर्धनासाठी मातीशी इमान राखा- गावडे

Goa _ तळावलीत भारत भूय चित्रफीतीसह कलाकृतीचे अनावरण

Sanjay Ghugretkar

फोंडा (प्रतिनिधी) ः कलेचे संवर्धन करताना मातीशी इमान राखा असे सांगताना यशासाठी संघर्ष हा करावाच लागतो. मेहनत घेतली तर कष्टाचे फळ आपोआप मिळते, म्हणून कष्ट करण्यासाठी मानसिकता तयार करा आणि सागर नाईक मुळे यांच्यासारखे प्रयत्‍नात सातत्य ठेवा, असे आवाहन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे (Govind Gawade) यांनी आवाहन केले. तळावली (Talavali) येथील महालक्ष्मी (mahalaxmi) युवक संघाच्या सभागृहात सागर नाईक मुळे यानी माती व पानांच्या नैसर्गिक रंगांपासून कलाकृती साकारली आहे, त्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम काल झाला. भारत भूय चित्रफीतीचेही Bharat Bhuiyan Videoयावेळी लोकार्पण करण्यात आले. (Goa)

यावेळी फोंड्याचे आमदार रवी नाईक, महालक्ष्मी युवक संघाचे अध्यक्ष सुदेश भिंगी, साईश पाणंदीकर, विघ्नेश नाईक व सागर नाईक मुळे आदी उपस्थित होते. गोविंद गावडे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करीत सागर नाईक मुळे यांनी मातीच्या रंगांपासून सुंदर अशी कलाकृती निर्माण केली आहे. भारत भूयवर चित्रफीतही सुरेख अशी चित्रित केल्याने गोव्यच्या कलाकाराचे मातीशी असलेले नाते स्पष्ट होते, असे सांगून सागर नाईक मुळे यांना शुभेच्छा दिल्या. आमदार रवी नाईक यांनी सागर नाईक मुळे यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे नमूद करून अंत्रुज महालातील कलाकारांनी गोव्याचे नाव केवळ राज्यात व देशातच नव्हे तर जगात पोचवले आहे. कलाकारांनी कलेच्या प्रती प्रामाणिक राहून सेवा द्यायला हवी. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या कलाकाराचे भवितव्य उज्ज्वल असते, त्यामुळे मेहनत करा, कष्ट करा आणि यश संपादन करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी साईश पाणंदीकर यांनी सागर नाईक मुळे याने घेतलेल्या कष्टाचे अभिनंदन करताना प्रत्येक कलाकाराने अशाप्रकारे मेहनत घेतली तर कलेच्याप्रती नवनवीन आविष्कार घडवण्याची किमया साधली जाऊ शकते, असे नमूद केले. सुदेश भिंगी यांनी सागर नाईक मुळे यांचे अभिनंदन करताना अंत्रुज महालातील कलाकाराने साकारलेल्या कलाकृतीमुळे कलेच्या क्षेत्रात अधिकाधिक संधी असल्याचे स्पष्ट झाले असून प्रत्येक कलाकाराने कलेची सेवा करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आभारप्रदर्शन मनोहर भिंगी यांनी केले तर सागर नाईक मुळे यांनी आपल्या मनोगतात तयार केलेल्या कलाकृतीबद्दल माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT