Goa in Road Dainik Gomantak
गोवा

Goa Road Issue: बायंगिणी - सांतान रस्ता पुढील एक वर्ष राहणार बंद!

Goa Road Issue: धिम्या गतीने काम: कामाची मुदत 240 दिवस

दैनिक गोमन्तक

Goa Road Issue: बायंगिणी – सांतान येथील रस्ता 28 जुलै 2023 पासून बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. संरक्षण भिंत कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.

या रस्त्याचे काम करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला गेला असून निविदा काढल्यानंतर पावसाळा वगळता 240 दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे पुढील एक वर्ष हा रस्ता बंदच राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बायंगिणी - सांतान रस्त्याविषयी वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्न विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले आहे.

28 जुलैला कोसळली होती भिंत

28 जुलै रोजी बायंगिणी – सांतान रस्त्यावरील संरक्षण भिंत कोसळली होती. या भिंतीला भेगा पडल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर भिंत कोसळली. सविस्तर प्रकल्प अहवालात भिंत कोसळण्याचे मुख्य कारण पाणी झिरपून संरक्षक भिंतीची छिद्रे गाळाने बंद झाल्याने पावसाळ्यात पाण्याचा ताण वाढला, परिणामी एका बाजूने भिंत कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT