Goa Weather: Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: 'बावी' चक्रीवादळामुळे राज्‍यात पाऊस मंदावला! मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ

Bavi Cyclon: ‘बावी’ चक्रीवादळामुळे गोव्यासह देशभरात मान्सूनचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘बावी’ चक्रीवादळामुळे गोव्यासह देशभरात मान्सूनचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्‍या कपाळाला आठ्या पडल्‍या असून जलसाठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जुलैच्या मध्यातही कडक उन्हाचा तडाखा कायम आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत सुमारे ३३ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनच्‍या पूर्व किनारपट्टीला निर्माण झालेल्‍या ‘बावी’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रभाव कमकुवत झाला आहे.

तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने मान्सूनला आवश्यक बळ मिळालेले नाही. शिवाय उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचाही प्रभाव वाढला आहे. निवृत्त हवामान शास्त्रज्ञ एम. रमेशकुमार यांनी सांगितले की, ‘बावी’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे वारे चीनच्या दिशेने खेचले गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

तापमानात प्रचंड वाढ; उन्‍हाच्‍या झळा

पावसाअभावी राज्यातील कमाल तापमान सोमवारी ३३.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ४.१ अंश आणि ३.१ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT