Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Bardez Water Crisis: ‘जलसंपदा’च्‍या अभियंत्यांची खैर नाही! मुख्यमंत्री खवळले; बार्देशातील ‘पाणीबाणी’ वर व्यक्त केली दिलगिरी

Goa Irrigation Department Negligence: जलसंपदा खात्याच्या या कारभारामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून बार्देशाला मुबलक पाणीपुरवठा करता आला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बार्देश तालुक्यातील ‘पाणीबाणी’ ही तिळारीचा कालवा फुटल्याने नव्हे तर प्रत्यक्षात गोवा जलसपंदा खात्याच्या निष्काळजीपणामुळेच उद्‌भवली आहे, यावर मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. ‘गोमन्तक’ने त्याबाबत वृत्त दिले होते. मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत म्हटले की, मागील सात दिवसांपासून आमठाणे धरणाची गेट उघडत नसल्याने आवश्यक पाणीसाठा धरणातून घेता आला नाही.

जलसंपदा खात्याच्या या कारभारामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून बार्देशाला मुबलक पाणीपुरवठा करता आला नाही. अशावेळी घडलेल्या प्रकाराला जलसंपदा विभागाचे जबाबदार असलेल्या संबंधित अभियंत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आमठाणे धरणाची गेट बुधवारी सकाळी ५.४० वाजता उघडले गेले. त्यामुळे आज बुधवारी सायंकाळपर्यंत बार्देशला मुबलक पाणीपुरवठा केला जाईल. या पाणीबाणी समस्येबद्दल मी लोकांकडे दिलगिरी व्यक्त करतो. सात दिवस आमठाणे धरणाची गेट उघडी करण्यास दिरंगाई होते. या प्रकाराला जलसंपदा विभागाचे जबाबदार असलेल्या अभियंत्यांवर सक्त कारवाई केली जाईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असे स्पष्ट केले.

३०० कोटी खर्चून कालव्‍यांची दुरुस्‍ती

तिळारी कालव्यातून येणारे पाणी बंद झाले तर आमठाण्यातून पर्यायी पाण्याची व्यवस्था केली आहे. तिळारीच्या कालव्याला महाराष्ट्राच्या हद्दीत भगदाड पडले. गोव्याच्या (Goa) हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती ३०० कोटी रुपये खर्चून केली जात आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील कामासाठी गोवा सरकारच्या वाट्याचे १२४ कोटी रुपये देण्‍यात येतील, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले.

तिळारीच्या कालव्याच्‍या दुरुस्तीसाठी सरकारने (Government) आवश्यक खबरदारी घेऊन काम हाती घेतले आहे. आमठाणे धरणातून पाणी घेण्याची पर्यायी व्यवस्था केली होती, मात्र अभियंत्यांना या धरणाचे गेट उघडता आली नाही. हे गेट बुधवारी पहाटे पाच वाजता खुले झाले. मात्र निष्‍काळजीपणाबाबत जलसंपदा खात्‍याच्‍या संबंधित अभियंत्यांवर कारवाई केली जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरेसे कच्चे पाणी मिळणे सुरू झाले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून बार्देशच्या काही भागात आज पाणीपुरवठा करता आला. पर्वरीतील काही भागातही सायंकाळी पाणी पोहोचले. दररोज शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळाले की बार्देशची तहान भागवणे शक्य होणार आहे.

संतोष म्‍हापणे, (मुख्य अभियंता-सांबाखा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT