Cuchelim Comunidad Dainik Gomantak
गोवा

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

कुचेली कोमुनिदादची जागा संपादन करुनही प्रशासनाकडून तिथे हालचाली होत नसल्याची संधी साधून काही राजकीय प्रेरित तसेच सूत्रधारांनी या जागेचा परस्पर सौदा करण्याचा घाट घातला.

Manish Jadhav

म्हापसा: खडपावाडा-कुचेली येथे कुचेली कोमुनिदादच्या जागेत तब्बल 140 कुटुंबीयांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत. ही सर्व बांधकामे बेकायदा असून सदर जागा खाली करण्याच्‍या नोटिसा बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांनी संबंधितांना बजावल्या आहेत. ही जागा सरकारने संपादित केली असून याठिकाणी सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधण्यात येईल. त्यामुळे लवकरच या अनधिकृत बांधकामांवर प्रशासकीय बुलडोझर फिरणार आहे.

कुचेली कोमुनिदादची जागा संपादन करुनही प्रशासनाकडून तिथे हालचाली होत नसल्याची संधी साधून काही राजकीय प्रेरित तसेच सूत्रधारांनी या जागेचा परस्पर सौदा करण्याचा घाट घातला. या जागेचे भूखंड पाडून ते अनेकांना विकले. ज्यात स्थानिकांसह बिगरगोमंतकीयांचा समावेश आहे, जे मागील कित्येक वर्षे गोव्यात वास्तव्य करुन आहेत. अलीकडेच या लोकांनी पोलिसांच्या दाराशी जात, आमची फसवणूक झाली असून आम्हाला अभय द्यावे अशी विनवणी केली होती. तशी लेखी तक्रार संबंधितांनी पोलिसांत दिली होती.

प्रत्‍येकाकडून 5 ते 9 लाख रुपये उकळले

100 ते 150 चौ. मी. भूखंडासाठी या लोकांकडून सूत्रधारांनी सुमारे 5 ते 9 लाख रुपये घेतल्याचा दावा वरील जागेत घर बांधून वास्तव्य करणाऱ्यांनी लोकांनी केला आहे. जागा खरेदी केल्यानंतर, भाटकाराकडे तसेच संबंधितांकडे सर्व सोपस्कार कायदेशीर करून जागा मिळवून देण्याचे आश्‍‍वासनही संबंधित भोगवटादारांना काही ठगसेनांनी दिले होते. आता बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्यांना जागा खाली करण्याच्‍या नोटिसा काढल्याने, या लोकांना भूखंड पाडून जमिनींचा आर्थिक व्यवहार केलेल्यांचे दाबे सध्या दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT