Stray Animals Dainik Gomantak
गोवा

Bardez: बार्देशमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव! अपघातांत वाढ; शेतपिकाचेही होतेय मोठ्या प्रमाणात नुकसान

Bardez Stray Animals: तालुक्यातील विविध गावांतील शेतांमध्ये गुरं मोकाट फिरताना दिसतात. शेतांवरील पीक नुकसान, तसेच रस्त्यांवर गुरांचा वावर हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

Sameer Panditrao

बार्देश: बार्देश तालुक्यात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून वाहनचालकांसाठी ही एक मोठी समस्या ठरत आहे. रस्त्यावर वाहने चालवताना मोकाट गुरं, खड्डे आणि भटकी कुत्री यामुळे चालकांपुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही महिन्यांपूर्वी हडफडे येथे भटक्या जनावरामुळे दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावर उपययोजना आखण्यास सरकारला अपयश आले आहे

तालुक्यातील विविध गावांतील शेतांमध्ये गुरं मोकाट फिरताना दिसतात. शेतांवरील पीक नुकसान, तसेच रस्त्यांवर गुरांचा वावर हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. म्हापसा शहरासह पंचायत क्षेत्रांमध्येही मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले असूनही पंचायतींच्या कारवायांमध्ये काहीसा अंमलबजावणीचा अभाव आहे.

शिवसेना प्रमुख गीतेश कामत आणि समाजकार्यकर्ता सचिन किटलेकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. फास्ट फूड गाड्यांच्या आजूबाजूला मिळणाऱ्या अन्नामुळे ही कुत्री अधिक आक्रमक होत आहेत. त्यांच्यामुळे अपघात, लहान मुलांवर हल्ले आणि वाहतूक कोंडी या समस्या निर्माण होत आहेत.

महामार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवरही मोकाट गुरे दिवसभर बसलेली दिसतात. यामुळे अपघातांबरोबरच वाहनचालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागते. अनेक वेळा दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, आणि काही प्राणीप्रेमी जखमी जनावरांवर उपचार करतात.

ठोस उपाययोजना आवश्‍यक

शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा, अपघातांचे प्रमाण अधिक वाढून जनतेच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोंडवाडे उभारण्यात पंचायती अपयशी

उच्च न्यायालयाने प्रत्येक पंचायत व पालिका क्षेत्रात कोंडवाडे उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शासनाने निधीही दिला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अपुरी असल्याने समस्या अधिक गंभीर होत आहे. मोकाट जनावरांचा त्रास फक्त शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातही वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT