Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वैयक्तिक संबंध अन् शाळेत फोन वापरल्याचा खोटा आरोप; बार्देश येथे शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, गुन्हा दाखल

Bardez: बार्देश येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला.

Sameer Amunekar

कळंगुट: बार्देश येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला असून, १७ वर्षीय विद्यार्थिनीला मानसिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षिकेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास शिक्षिकेने संबंधित विद्यार्थिनीचा शाळेत अपमान केला. शिक्षिकेने मुलीच्या वैयक्तिक संबंधांबाबत खोटे आरोप केला, तसंच शाळेच्या परिसरात मोबाईल फोन वापरल्याचा आरोप करत तिची प्रतिमा मलिन केली.

या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिकरीत्या पूर्णपणे खचली असून तिला सतत तणाव आणि भावनिक आघाताचा सामना करावा लागत आहे. मानसिक अस्थिरतेमुळे तिने सध्या शिक्षणालाही विराम दिला असून ती उपचार घेत आहे. कुटुंबीयांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

तक्रारीवर कारवाई करत साळगाव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गोवा बाल कायदा कलम ८ तसेच बाल न्याय कायदा कलम ७५ अंतर्गत १४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या देखरेखीखाली सुरू असून पीएसआय सर्वेश भंडारी पुढील तपास करत आहेत. घटनेबाबत पुढील तपासानंतर शिक्षिकेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT