Bank closed for corona cases

 
Dainik Gomantak
गोवा

BOIचे कर्मचारी कोरोनाबाधित, शाखा बंद

पणजीमधील बँक ऑफ इंडियाच्या कांपाल शाखेमधील प्रकार

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सध्या कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या वाढतच चालल्याचं चित्र आहे. यातच ओमिक्रॉनचे रुग्णही गोव्यात (Goa) सापडू लागले आहेत. यातच भर म्हणजे बँक ऑफ इंडियाच्या (BOI) कांपाल शाखेतील कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खातेदारांच्या सुरक्षिततेसाठी शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान बँक (Bank) ऑफ इंडियाच्या कांपाल शाखेबाहेर नेहमीप्रमाणेच खातेदारांची रांगही पाहायला मिळाली. मात्र खातेदारांना बँकेबाहेर नोटीस लावलेली पाहायला मिळाली, ज्यात लिहिलं आहे की, बँक ऑफ इंडियाच्या कांपाल शाखेत कोरोनाचा (covid 19) संसर्ग झाल्याने आपल्या सुरक्षिततेसाठी आणि पुढील प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाखा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. ही बाब मनपा आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणली असून ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपली कामं बँकेच्या नजिकच्या शाखांमधून करुन घ्यावीत.

कोरोनाचा (Corona) प्रसार बँकांप्रमाणेच कसिनो, हॉटेल्स, मॉल्स यासारख्या ठिकाणीही वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र अद्यापही सरकारने कोणतीही ठोस पावलं उचलली नसल्याचं चित्र आहे. पर्यटकांचीही गोवा (Goa) राज्यात येजा सुरुच असल्याने कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT