Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लग्न करण्यासाठी प्रेमी युगुल कर्नाटकातून गोव्यात आलं; वाद झाला अन् प्रियकराने प्रेयसीचा गळाच चिरला

Goa Murder Case: गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला यातच संजयने रोशिनीचा खून केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

Pramod Yadav

धारबांदोडा: प्रतापनगर येथे झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी बंगळुरु येथून एका संशयिताला अटक केली आहे. फोंडा पोलिसांनी तपास चक्रे गतीमान करत २४ तासांत संशयिताला अटक केली. तसेच, खून झालेल्या तरुणीची देखील ओळख पटली असून, चौकशीत अटक तरुणाने महत्वाची माहिती दिली आहे.

संजय केविन एम (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. तर, रोशिनी मोसेस एम. (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रतापनगर येथे घनदाट जंगलात रोशिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृत तरुणी अज्ञात असल्याने खूनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

दरम्यान, फोंडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खून प्रकरणातील संशयित संजय केविनला बंगळुरु येथून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत संजयने महत्वाची माहिती दिली आहे. संजय आणि रोशिनी यांचे एकमेकांवर प्रेम होते, दोघांना लग्न करायचे होते. लग्न करण्यासाठीच ते बंगळुरुतून गोव्यात आले होते.

गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला यातच संजयने रोशिनीचा खून केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

या खून प्रकरणात आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दोघे लग्न करण्यासाठी गोव्यात आले होते तर नेमके दोघांमध्ये काय बिनसले आणि प्रियकराने टोकाचे पाऊल उचलत प्रेयसीचा खून केला? याबाबत चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'साप दिसला म्हणून मारला ब्रेक, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या'; रेडीघाटात स्कुटरचा चक्काचूर, एकजण गंभीर जखमी

LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा 'काळाबाजार' उघडकीस! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत

Rashi Bhavishya: श्री मारुतीराया होणार प्रसन्न! 'या' राशींना लाभणार कृपाशीर्वाद; नवीन संधींची शक्यता

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

SCROLL FOR NEXT