Bandora Dainik Gomantak
गोवा

Bandora: ..झळाळती कोटी ज्योती या!बांदोड्यात गरजू कुटुंबाचे घर उजळले; सोलर पॅनलचा केला वापर

Bandora Solar Light: बांदोडा पंचायत क्षेत्रातील एका गरजू कुटुंबाच्या घरी विजेचा दिवा लागला आणि या कुटुंबातील पती पत्नी गहिवरले. पती-पत्नी आणि एक छोटीशी मुलगी असे हे कुटुंब आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: बांदोडा पंचायत क्षेत्रातील एका गरजू कुटुंबाच्या घरी विजेचा दिवा लागला आणि या कुटुंबातील पती पत्नी गहिवरले. पती-पत्नी आणि एक छोटीशी मुलगी असे हे कुटुंब आहे. माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या सहकार्याने पेशाने मोटारसायकल पायलट असलेल्या मोहन गावडे यांच्या घरी सोलरचा हा दिवा पेटला आणि गेला बराच काळ विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या गावडे कुटुंबीयांचे घर प्रकाशमान झाले.

बांदोडा पंचायत क्षेत्रातील फर्मागुढी परिसरात असलेल्या या गावडे कुटुंबाने छोटेसे घर बांधले आहे. मात्र, काही कारणास्तव या घराला वीज खात्यातर्फे वीज कनेक्शन देण्यास अडचणी निर्माण झाल्या.

मात्र वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सुवर्णमध्य साधत सोलर एनर्जीद्वारे या कुटुंबाला वीज कनेक्शन दिले त्यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वात युवा नेता मिथिल ढवळीकर यांच्याकडे प्रस्ताव मांडल्यानंतर लगेच मंजुरी देण्यात आली आणि अखेर गावडे कुटुंबाचे घर उजळले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गावडे कुटुंबाला शुभेच्छा देताना ट्रस्टकडून हा अशा प्रकारचा पहिलाच समाजोपयोगी उपक्रम असल्याचे नमूद केले.

समाजोपयोगी उपक्रम

सोलर पॅनल बसवून एखाद्या ट्रस्टच्या सहकार्याने आर्थिक मदत करून गरीब गरजूचे घर प्रकाशमान करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे सरपंच रामचंद्र नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम निरंतर माधवराव ढवळीकर ट्रस्टकडून आखले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुवर्णसंधी! गोव्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांचा 'नोकरी धमाका', 5000 पदांची होणार भरती; बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचा मास्टरस्ट्रोक

India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

Goa Budget Session 2026: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक पर्यटकांनी दिली भेट; मोपा विमानतळ ठरलं गेमचेंजर

SCROLL FOR NEXT