Banastarim Bridge Accident: Dainik Gomantak
गोवा

सुखी संसाराचे स्वप्न भंगले; बाणस्तारी मर्सडीज अपघातातील जखमी वनिता 8 महिने अंथरूणाला खिळून राहणार, आईला सोडावी लागली नोकरी

याच अपघाताने हिरावला होणारा नवरा, जखमी राज माजगावकरलाही डिस्चार्ज; तिसऱ्या जखमीवर दोन शस्त्रक्रिया

Akshay Nirmale

Banastarim Bridge Accident: गोव्यातील बाणास्तरी येथे ड्रंक अँड ड्राईव्हमुळे झालेल्या मर्सडीज अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. तर तिघे जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातातून बचावलेल्या राज माजगावकर (वय 27) आणि वनिता भंडारी (वय 21) यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तथापि, वनिता हीला पुढचे आठ महिने अंथरूणाला खिळूनच राहावे लागणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

6 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. परेश सावर्डेकर चालवत असलेल्या मर्सिडीजने बाणास्तरीत अनेक वाहनांना धडक दिली होती. यात तीन ठार आणि तीन गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये दिवार येथील सुरेश आणि भवन फडते यांच्यासह वनिताचा मंगेतर अरूप कर्माकर (26) यांचा समावेश आहे.

अद्याप वनिताला तिच्या कुटूंबियांनी अरूप याच्या मृत्यूची माहिती दिलेली नाही. हात आणि पायावर वाईट परिणाम झाल्यामुळे तिला व्हीलचेअरही वापरता येणार नाही. पुढील आठ महिने तीला पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल.

शस्त्रक्रियेनंतर आणि जवळपास पंधरा दिवसानंतर वनिताला डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु खडखडीत बरे होण्यासाठी तिला काही काळ लागणार आहे. ही लांबलेली प्रक्रिया तिच्यासाठी अर्थातच वेदनादायी असणार आहे. उजव्या हाताला आणि उजव्या पायाला अनेक फ्रॅक्चर झालेल्या वनिताला बसता येत नाही.

त्यामुळे पुढचे आठ महिने तिला अंथरुणावरच घालवावे लागतील. वनिता सध्या बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. पण आता ती कॉलेजही करू शकणार नाही. तिची आई मंजुळा या एकल पालक आहेत. त्या फोंडा उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना मुलीची पूर्णवेळ काळजी घेण्यासाठी नोकरी सोडावी लागली आहे. आठ महिन्यांनी वनिताला बरे वाटले नाही तर तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होऊ शकते. तिच्या डोक्याला अनेक टाके पडले आहेत.

दरम्यान, राज माजगावकर यांलाही GMC मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजगावकर बरे झाले आहेत. या अपघातातील तिसरे अपघातग्रस्त शंकर हळर्णकर (वय 66) यांच्यावरही GMC च्या न्यूरोसर्जरी विभागात दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

ते माजगावरकर यांचे मेहुणे आहेत. त्यांना अपघातामुळे अर्धांगवायूचा झटका आला होता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन शस्त्रक्रियेनंतरही ते बरे झालेले नाहीत. त्यांना पूर्णवेळ काळजीची गरज आहे. जीएमसीमध्ये फिजिओथेरपी सत्र सुरू आहेत. त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यासाठी खूप काळ जावा लागेल. तेही अंथरुणावरच खिळून आहेत. हळर्णकर यांच्या कुटूंबीयांची घडीही यामुळे विस्कळीत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारी 'या' 3 राशींना मिळणार मोठी शुभवार्ता, नशिबाचे दरवाजे खुलणार

Lionel Messi In India: ठरलं! भारतात येतोय फुटबॉलचा बादशहा 'मेस्सी'; केरळमध्ये खेळणार सामना

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

SCROLL FOR NEXT