Banastarim Bridge Accident, Mardol police station Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरण; महिलेला अटक करा, म्हार्दोळ पोलीस स्टेशनला जमावाचा घेराव

विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने गोळा झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात गर्दी केली आहे.

Pramod Yadav

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातातील मुख्य दोषींनी अटक करा या मागणीसह म्हार्दोळ पोलीस स्टेशनला जमावाने घेराव घातला आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने गोळा झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात गर्दी केली आहे.

महिलेला अटक करा या मागणीसाठी जमावाने पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना घेराव घातला. पोलीस महिलेचा बचाव करत असल्याचे म्हणत जमावाने पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला आहे.

Banastarim Bridge Accident, Mardol police station

संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या चर्चा केली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

मर्सिडीजमधील त्या महिलेला ताबडतोब अटक करा, अशी मागणी जमावाने केली आहे. तर, पोलीस लोकांकडे पुराव्याची मागणी करत आहेत. यामुळे म्हार्दोळ पोलीस स्टेशन परिसरातील वातावरण तंग झाले आहे. पोलीस महिलेचा बचाव करत असल्याचा लोकांनी आरोप केला आहे.

Banastarim Bridge Accident, Mardol police station

अद्याप पोलीस ठाण्यात जमावाचा गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अपघातावेळी कार नक्की कोण चालवत होते हा तिढा कायम आहे. पण, प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलिंगकर यांनी पोलिसांनी दाखल FIR ला आव्हान दिले असून, अपघातावेळी महिलाच कार चालवत होती असे म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शीने दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: म्हापसा दरोड्यातील आरोपींनी पळवलेली कार पणजी पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळली

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT