Sateri Devasthan Hasapur Dainik Gomantak
गोवा

Hasapur Devasthan Bans Muslims: मुस्लिमांना जत्रेत दुकाने लावण्यास बंदी; गोव्यातील मंदिराबाहेरील पोस्टरमुळे नवा वाद

Sateri Temple Hasapur: फातर्पा येथील जत्रोत्सवात असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता हसापूर येथील देवस्थानने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उत्सवात मुस्लिम विक्रेत्यांना बंदी घातल्याने हे लोण संपूर्ण गोव्यात पसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: हिंदूंच्या धार्मिक उत्सवात मुस्लिम विक्रेत्यांवर बंदी घालण्याचे लोण आता उत्तर गोव्यातही पोहचले असून २२ रोजी पेडणे तालुक्यातील हसापूर येथील सातेरी देवस्थानच्या जत्रोत्सवात मुस्लिम विक्रेत्याला स्टॉल घालण्यापासून रोखण्यात आले. तसेच जत्रोत्सवाच्या ठिकाणी मुस्लिम विक्रेत्यांना स्टॉल थाटण्यास बंदी असल्याचे जागृती फलक लावण्यात आले आहेत.

याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष मळीक यांनी सांगितले की, हसापूर येथील देवस्थानच्या उत्सवात मुस्लिम विक्रेत्यांना दुकाने थाटण्यास बंदी घातली आहे. याबाबत फलक लावून जागृती केली आहे. जत्रोत्सवात सकाळीच एका मुस्लिम विक्रेत्याने स्टॉल थाटण्याची तयारी चालवली होती, देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर लगेच त्याला स्टॉल हटविण्यास लावले. यापुढे देवस्थानच्या कुठल्याही उत्सवावेळी मुस्लिम विक्रेत्यांना प्रवेश असणार नाही, असे ते म्हणाले.

सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता

फातर्पा येथील जत्रोत्सवात असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता हसापूर येथील देवस्थानने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उत्सवात मुस्लिम विक्रेत्यांना बंदी घातल्याने हे लोण संपूर्ण गोव्यात पसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे गोव्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यताही काहीजण व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

SCROLL FOR NEXT