Ban on sale of liquor after 11 pm in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रात्री 11 नंतर मद्यविक्री बंदी

मद्य नसलेली इतर दुकाने व आस्थापने ही नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत खुली ठेवता येतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्श्‍वभूमीवर राज्यात (Goa) निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे रात्री 11 वाजल्यानंतर राज्यात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी राज्यातील आचारसंहिता असेपर्यंत कायम असेल असे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाल यांनी आदेशात म्हटले. मद्यविक्री करणारी घाऊक व किरकोळ दुकाने, बार, पब्ज, शॅक्स तसेच क्लबना रात्री 11 वाजल्यानंतर मद्यविक्री करता येणार नाही.

मद्य नसलेली इतर दुकाने व आस्थापने ही नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत खुली ठेवता येतील. रात्री 11 नंतर दारू विक्री आढळल्यास त्याचा दारू विक्रीचा परवाना रद्द करण्या बरोबर दुकान मालकावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यात ओमिक्रॉन बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून पॉझिटिव्हिटी रेट 40 टक्क्यांच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. आज सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 596 झाली आहे तर पॉझिटिव्हिटी रेट 39.10 टक्क्यांवर गेला आहे. चोवीस तासात नवे 3145 रुग्ण सापडले आहेत.

राज्यात18 हजार 597 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी222 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यामध्ये गोमेकॉत157 तर खाजगी रुग्णालयांमध्ये 65 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी गोमेकॉत 17 तर खाजगीमध्ये12 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्बंध31जानेवारीपर्यंत वाढवावेत असे आवाहन ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ.धनेश वळवईकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT