EVM Machine  Dainik Gomantak
गोवा

EVM Machine : ‘ईव्हीएम’ नकोच; निवडणुकीत मतपत्रिकेवरच मतदान घ्या! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

EVM Machine : ‘गोवा अगेन्स्ट ईव्हीएम’चा मोर्चा, या मोर्चात १०० हून अधिक आंदोलकांनी भाग घेतला होता, त्या मोर्चाला पोलिसांनी तासभर कार्यालयाबाहेर रोखून धरण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

EVM Machine :

पणजी, लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवरच मतदान घ्या, या मागणीसाठी ‘गोवा अगेंस्ट ईव्हीएम’च्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी आल्तिन्हो पणजी येथील मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा नेला.

ईव्हीएम मशीनला विरोध करणारे निवेदनही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. या मोर्चात १०० हून अधिक आंदोलकांनी भाग घेतला होता, त्या मोर्चाला पोलिसांनी तासभर कार्यालयाबाहेर रोखून धरण्यात आले.

 गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’चा मतदानासाठी वापर न करता  मतपत्रिकेद्वारे मतदानाची अंमलबजावणी करावी,अशी मागणी गोवा अगेंस्ट ईव्हीएमच्या शिष्टमंडळाने सोमवारी केली. या शिष्टमंडळाने आल्तिनो येथे आणलेल्या मोर्चाने पोलिसांनी अडवल्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.

‘ईव्हीएम’ ला विरोध करणाऱ्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना पत्र लिहून गोव्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन न वापरण्याची मागणी केली आहे. हे पत्र नंतर शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या आल्तिनो पणजी येथील कार्यालयात सुपूर्द करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर महिला पोलिस आणि इतर सशस्त्र पोलिसांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

अधिकाऱ्याला निवेदन सादर केल्यानंतर,  ‘ईव्हीएम हटाओ’ गटाच्या कोअर कमिटी सदस्यांपैकी एक ॲड. भानु प्रताप सिंह म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’ला विरोध करणाऱ्या गोवावासीयांच्या १ लाख स्वाक्षऱ्या असलेले निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आता हे पत्र राष्ट्रपतींना पाठवावे लागणार आहे. ईव्हीएममध्ये सहज फेरफार करता येऊ शकतो, त्यामुळे गोव्यात बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे,अशी मागणी केली पाहिजे.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनीही नमूद केले की १९९९ मध्ये मतदानासाठी ईव्हीएम वापरणारे गोवा हे पहिले राज्य होते. यावेळी मतदानासाठी ‘ईव्हीएम’ नको म्हणणारेही गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे. गोवा निवडणुकीत ईव्हीएम टाळणे यशस्वी झाले की उर्वरित राज्येही याच पद्धतीचा अवलंब करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी, निषेध रॅलीदरम्यान, प्रतिमा कुतिन्हो, मन्सूर शेख आणि ईव्हीएमच्या विरोधात गोव्यातील इतर सदस्यांसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून देण्यात आले.

आंदोलकाला धक्काबुक्कीचा प्रकार

दरम्यान रंजन सिंग या एका निदर्शकाला एका अज्ञात युवकाकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की धक्काबुक्की करणारा तरुण कोण होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

पण जर नरेंद्र मोदी परत निवडून आले तर देशात अशीच परिस्थिती निर्माण होईल जी समाजासाठी धोकादायक आहे.

यापूर्वी, सोमवारी सकाळी, आझाद मैदानावर गोवा अगेन्स्ट ईव्हीएमच्या शिष्टमंडळाने आंदोलकांना मार्गदर्शन केले आणि ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार करता येतो, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी अनेकांची भाषणे झाली आणि त्यात त्यांनी मतपत्रिकेवरच मतदान घेण्याची मागणी उचलून धरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT