Accident News Canva
गोवा

Bambolim Accident: दुर्दैवी! बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालकाला भरधाव कारने उडवले, ट्रकचालकाचा मृत्यू

Goa Accident: बांबोळी येथील नव्या नियाझ आस्थापन असलेल्या इमारतीजवळ बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालकाला भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवले.

Sameer Panditrao

पणजी: बांबोळी येथील नव्या नियाझ आस्थापन असलेल्या इमारतीजवळ बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालकाला भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवले. या ट्रकचालकाला गंभीर अवस्थेत गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी मूळचा बिजापूरचा कारचालक आकाश हनुमंत नंदोनी (२३, घोगळ - मडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक बिघडल्याने चालक सुरेंद्र बिष्णोई (४४) हा जवळच उभा होता. पणजीहून मडगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारचालक आकाश नंदोनी याच्या कारने त्याला धडक दिली.

या अपघातात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला व शरीराला जबर मार लागला. त्वरित त्याला गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात त्याच्या ट्रकमालकाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. चालकाची मद्य चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काल रात्री पणजी पोलिसांमार्फत विविध ठिकाणी नाकाबंदी करून तसेच वाहनांची तपासणी करण्यात येत होती. विनाहेल्मेट तसेच मद्यप्राशन करून वाहन हाकणाऱ्यांची चाचणी करण्यात येत होती. वाहतूक व स्थानिक पोलिसांमार्फत वेळोवेळी धडक मोहीम सुरू करूनही वाहनचालक राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहने भरधाव चालवण्याचे सोडत नाहीत.

या महामार्गावर अत्याधुनिक यंत्रणा बसवल्यास वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्याची नोंद सीसी टीव्ही कॅमेरात होऊन वारंवार दंडाची रक्कम जमा करण्यास लागल्यावर काही प्रमाणात लगाम येईल, असे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT