BalRath Employees on Strike  Dainik Gomantak
गोवा

BalRath Employees Strike: बालरथ कामगारांचा संप, विद्यार्थ्यांचे हाल, वेतनवाढीच्या मागणीवर ठाम

आझाद मैदानावर ठिय्या

दैनिक गोमन्तक

BalRath Employees Strike: वाढीव वेतनाच्या मागणीसाठी युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार सोमवारपासून संपावर गेले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून राजधानीतील आझाद मैदानावर या कामगारांनी ठिय्या मांडला. दरम्यान या संपामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

शिक्षण संचालनालयाने वाढवलेले वेतन कामगार संघटनेला नामंजूर आहे. संपाच्या निर्णयावर कामगार ठाम आहेत, असे युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.

बसचालकांना दरमहा ११ हजार आणि क्लिनरना ५ हजार ५०० रुपये वेतन दिले जात होते. त्याऐवजी चालकांना किमान २० हजार आणि क्लिनरला १४ हजार ५०० रुपये दिले जावेत, अशी मागणी संघटनेची आहे. दरम्यान, शिक्षण संचालनालयाने चालकांना १२ हजार व क्लिनरना ६ हजार रुपये देण्याचे मंजूर केले आहे, परंतु ही वाढ संघटनेने फेटाळली आहे.

संपात ४८० कामगार

या संपात राज्यातील ४२० बालरथांवरील चालक-क्लिनर असे ८४० कामगार सहभागी झाले आहेत. बालरथ कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाची नोटीस शिक्षण खात्यासह शिक्षण संस्थांना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT