CM Pramod Sawant on Balrath Accident at Balli:  Dainik Gomantak
गोवा

Balrath Accident: बाळ्ळीतील बालरथ बस अपघाताच्या चौकशीचे आदेश, जखमींवर आवश्यक उपचार करणार

ट्राफिक विभाग, शिक्षण खाते आणि PWD ला मुख्यमंत्र्यांचे आदेश

Akshay Nirmale

CM Pramod Sawant on Balrath Accident at Balli: बाळ्ळी येथे झालेल्या बालरथ स्कूल बस अपघातप्रकरणी वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम खाते आणि शिक्षण खाते यांना सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दरम्यान, या बसमध्ये एकू 34 विद्यार्थी होते. बसमधील 17 मुलांना दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघा विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

या अपघातात एकूण चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या अपघाताबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ट्राफिक, पीडब्ल्यूडी आणि शिक्षण खात्यांना या अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व उपचार केले जातील.

या बसेसमध्ये किती विद्यार्थी असावेत याची काही मर्यादा आहे. पण शाळा व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही. आम्ही त्यांना निधी देतो. अशा घटना टाळण्यासाठी धोरण तयार करू.

हा अपघात दुर्दैवी आहे. मी सविस्तर अहवाल मागवला आहे. आम्ही बाल रथ बसेसची नियमित देखभाल व्हावी यासाठी निधी देतो. शाळा व्यवस्थापनाने बस सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

आमदार डिकॉस्टा यांची टीका...

केपेचे आमदार आल्टन डिकॉस्टा म्हणाले, बालरथ बसेसचे ऑडिट होणे गरजेचे आहे. हा मुद्दा आम्ही विधानसभेत उपस्थित केला होता. पण सरकारने त्यावर काहीही केलेले नाही. आता तरी हा मुद्दा गांभीर्याने घेतला जावा. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ होता कामा नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT