Baga Beach Fire File photo
गोवा

Baga Beach Fire: बागा बीचवरील नाईट क्लबमध्ये आग; पार्टी करणाऱ्यांमध्ये उडाला गोंधळ

आगीत काही एअर कंडिशनर युनिट्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणांचे नुकसान

दैनिक गोमन्तक

Baga Beach Fire: गोव्यात सुरू असलेल्या आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. काल तरी बागा समुद्रकिनाऱ्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. बागा बीचवर असलेल्या एक नाईट क्लबमधल्या एका खोलीत आग लागल्याने क्लबमध्ये पार्टी करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला.

ज्या खोलीत वातानुकूलित युनिट ठेवण्यात आले होते त्या खोलीत ही आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत आग विझवण्यात नाईट क्लबच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या आगीत काही एअर कंडिशनर युनिट्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणांचे नुकसान झाले आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गोव्यात आगीच्या घटना वाढलेल्या असताना (ता.22) चांदर येथे सातान जुआव रॉड्रिग्ज यांच्या मालकीच्या लाकडाच्या वखारीजवळ असलेल्या लाकडांच्या ओंडक्यांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्घटना दुपारी बुधवारी 12 वा.च्या सुमारास घडली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT