Goa Bad Roads  Dainik Gomantak
गोवा

विसर्जन पार पडले तरी खड्डे दुरुस्ती नाहीच! स्वागत कमानीवर खर्च मात्र रस्ते..?

Bad Roads In Goa: पणजी शहर परिसरातील गणपतींचे विसर्जन पार पडले तरीही रस्त्यावरील खड्डे कायम; आम्हाला तात्पुरता खड्डेमुक्त रस्ता द्या पर्वरीत मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी शहर परिसरातील दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. तरीही परिसरातील रस्त्यावरील खड्डे अजूनही मुक्कामाला असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती परंतु पणजी शहरवासीयांच्या आशेवर विरजणच पडले. त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

मळा, फोन्ताइन्हास व भाटले येथील पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. भाटल्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पेव्हर्स टाकून उपाय शोधला खरा, पण या कामातही चलावूपणा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. पेव्हर्स खचल्याने काही ठिकाणी ते खाली वर झालेले आहेत, तर काही पेव्हर्सने जागाही सोडली आहे.

त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. मागील महिन्यात हे काम करण्यात आले, त्याचवेळी एकजण दुचाकीस्वार निखळलेल्या पेव्हर्समुळे पडल्याने गंभीर जखमी झाला होता. या कामावरून समाजमाध्यमांवर महानगरपालिकेच्या कामाविषयी आणि आमदारावर टीका झाली होती.

सांतिनेजमधील रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर मळ्यातील आणि भाटलेतील रस्ते चांगल्याप्रकारे निर्माण होतील, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीच्या कामासाठी जे खोदकाम झाले, ते काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या भरले गेले नाहीत. खड्ड्यांवर काँक्रिट टाकून भरण्यात आले, पण ते काँक्रिट काही ठिकाणी निघून गेल्याने तो भाग दुचाकीस्वारांसाठी अपघातांना निमंत्रण देत आहे.

मळ्यातील अंतर्गत रस्तेही खराब झालेले आहेत, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. रविवारी रायबंदरवासियांनी परिसरातील खड्डेमय रस्त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले. या आंदोलनात मंत्री तथा आमदार बाबूश मोन्सेरात यांचे समर्थक होते, त्यांनीच रस्त्यासाठी आता धावा केला आहे. या परिसरातीलही पाच दिवसाच्या गणपतीने तेथील रस्त्यावरील खड्डे ओलांडून भाविकांपासून निरोप घेतला आहे.

विसर्जनस्थळी कमानीवर खर्च

गणपती विसर्जनस्थळी गणेशभक्तांचे स्वागत करणाऱ्या कमानी उभारण्यावर महानगरपालिकेने मोठा खर्च केला आहे. परंतु रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे केलेल्या दुर्लक्षावर समाजमाध्यमांतून नेटकऱ्यांनी बोट ठेवले आहे. याशिवाय आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा फलक शहरात त्यांच्या समर्थकांनी उभारलेले नजरेस पडतात, पण दुरवस्था झालेल्या रस्त्यांकडे कोण पाहणार, असे प्रश्‍नही नेटकरी विचारत आहेत.

तात्पुरता खड्डेमुक्त रस्ता तरी द्या...

पर्वरी महामार्गावर काम सुरु होणार असल्याने वाहतूक वळविण्यात येईल याची माहिती असूनही खड्डेमुक्त रस्ता देण्याचे बांधकाम खाते विसरले आहे. सरकारी विभागाने योग्यरित्या योग्य वेळी काम केले तर गोमंतकीय सरकारच्या कुठल्याच कामाला विरोध करणार नाहीत, परंतु सरकार लोकांना गृहीत धरून निकृष्ट दर्जाच्या सेवा देत आहे. पर्वरी महामार्गाचे काम करा पण आम्हाला तात्पुरता खड्डेमुक्त रस्ता द्या, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT