court Dainik Gomantak
गोवा

पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी मंत्री बाबूशना तात्पुरता दिलासा, जेनीफर यांचा अर्ज फेटाळला

30 सप्टेंबर पर्यंत अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली

दैनिक गोमन्तक

Panaji police station attack : महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयाकडून मंत्री मोन्सेरात यांना दिलासा देण्यात आला आहे. तर आमदार जेनिफर यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

या प्रकरणी न्यायालयात हजर राहण्यापासून कामयची सूट मिळावी, यासाठी मंत्री बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी मडगाव कोर्टात अर्ज दाखल केला होता.

पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस आपल्याला कायमस्वरुपी गैरहजर राहण्याची महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा अर्ज खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी अंशतः मंजूर करताना 30 सप्टेंबर पर्यंत अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली. मात्र, त्यांच्या आमदार पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी यासाठी केलेला अर्ज पूर्णतः फेटाळून लावला.

मोन्सेरात दांपत्याने आपल्याला या सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी कायमस्वरूपी सूट मागितली होती. मात्र, या प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयने मागच्या सुनावणीच्या वेळी या मागणीला हरकत घेतली होती. न्यायालयाने सीबीआयची बाजू उचलून धरताना हा खटला गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्या संदर्भात असल्याने ही सूट देता येणार नाही हे स्पष्ट केले.

आमदार महसूल मंत्रीबाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात जे 2008 च्या पणजी पोलिस स्टेशनवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT