Babush Monserrate News | Panaji News Dainik Gomantak
गोवा

पणजी : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम

मुख्यमंत्र्यांनी दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी : बाबूश मोन्सेरात

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी आणि ताळगाव मतदारसंघात दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण काम करण्यात आले होते. मान्सूरच्या पहिल्याच तडाख्यात काम केलेल्या रस्त्यावरचे डांबर वाहून गेल्याने या कामाची चौकशी दक्षता खात्यामार्फत करावी, अशी मागणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. (Babush Monserrate News)

मंत्री मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांना पत्र लिहून निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संबंधित कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे. त्याशिवाय काम योग्य दर्जाचे झाले असल्याची मान्यता देणाऱ्या अभियंत्यांवरही कारवाईची गरज असल्याचे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले आहे. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरण कामाची माहिती मोन्सेरात यांनी पत्रकारांना दिली.(Panaji News)

ताळगाव आणि पणजी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. मॉन्सूनला सुरवात होताच दोनच महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून डांबर वाहून जाणे हे न पटण्यासारखे आहे. डांबरीकरण केलेले रस्ते अनेक वर्षे टिकतात. परंतु हा अनुभव वेगळा असल्याने प्रकरण गंभीर आहे. ताळगाव, पणजीतील रस्त्यांची वाताहत झाली असून, याला जबाबदार कंत्राटदार व अभियंते असल्यानेही मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, अशी आपली मागणी असल्याचे बाबूश मोन्सेरात म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT