Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate यांना तात्पुरता दिलासा; बलात्कार आणि पोलिस स्टेशन हल्ला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

आज सुनावणीवेळी पीडित महिला तिच्या साक्षीसाठी न्यायालयात हजर न झाल्याने सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याविरुद्धच्या कथित बलात्कार प्रकरणाचा खटला न्यायालयात आहे. आज सुनावणीवेळी पीडित महिला तिच्या साक्षीसाठी न्यायालयात हजर न झाल्याने सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे.

(Babush Monserrate Rape Case)

मागील सुनावणीवेळी पीडितेने सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठी तिच्या वकिलांना परवानगी देण्याचा अर्ज आज अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता. या खटल्यावरील सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्यासाठी संशयित मोन्सेरात यांनी परवानगी घेतल्याने ते मागील सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित नव्हते. ही सुनावणी आज 2 डिसेंबरला ठेवण्यात आली होती.

बलात्कारप्रकरणी मोन्सेरात यांच्यामागे ससेमिरा सुरूच

बाबुश मोन्सेरात व रोझारिया ऊर्फ रोझी फेर्रोस या दोघांविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली आरोप निश्‍चित होऊन त्यावरील खटला सुरू झाला आहे. पोलिसांच्या 250 पानी आरोपपत्रात 40 जण साक्षीदार आहेत. या घटनेची तक्रार महिला पोलिस स्थानकात मे 2016 मध्ये नोंद होऊन त्यावेळी मोन्सेरात व फेर्रोस यांना अटक झाली होती. जुलै 2018 मध्ये आरोपपत्र सादर केल्यानंतर जून 2019 मध्ये न्यायालयाने आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता.

‘पोलिस स्थानक’ प्रकरणाची सुनावणी

मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्यासह ३६ जणांविरुद्ध पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणीची सुनावणी न्यायालयात सुरू झाली आहे. या प्रकरणामध्येही न्यायालयाने संशयितांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास सांगितले असुन, या हल्ल्याची सुनावणी 6 डिसेंबरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT