Sonsodo Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Issue: सोनसोडोतील कचऱ्यावर साळगावात करणार प्रक्रीया; बाबूश मोन्सेरात यांची माहिती, क्षमतेतही केली वाढ

मंत्री मोन्सेरात : प्रकल्पाची क्षमता 100 वरून 250 टीपीडी

दैनिक गोमंतक

Sonsodo Garbage Issue: उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच मडगावातील सोनसडोवरील 30 टन कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे आणण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी या प्रकल्पाची क्षमता 100 टीपीडीवरून 250 टीपीडी करण्यात आली आहे.

अशी माहिती कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज गुरुवारी सभागृहात दिली. आमदार मायकल लोबो यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर मंत्री मोन्‍सेरात बोलत होते.

दक्षिण गोव्यातील कचरा साळगावला का? यामुळे या प्रकल्पात अतिरिक्त कचरा साचेल आणि त्याचा परिणाम या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होईल, अशी भीती लोबो यांनी व्यक्त केले होती. त्‍यावर अन्य सदस्यांनीही आक्षेप नोंदविला होता.

काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प मे 2023 पासून सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाची क्षमता 100 टीपीडी असून सध्या केवळ 18 टन कचरा या प्रकल्पावर येत आहे.

त्‍यासाठी 173 कोटी रुपये खर्च केले आहेत. पैकी 75 टक्के खर्च राज्य सरकारचा आहे, असेही कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT