Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar: ...तर प्रसंगी हातही मोडून टाकू; दवर्ली येथील 'त्या' घरांच्या समर्थनात बाबू आजगावकर

विधानसभा निवडणूक लढविल्यास पेडणेतूनच निवडणूक लढणार

गोमन्तक डिजिटल टीम

Davorlim : दवर्ली येथील 165 बेकायदेशीर घरे हा सध्या चर्चेचा विषय झालेला असताना ते लोक दुबळे म्हणून त्यांच्या घरावर हात घालण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास प्रसंगी हातही मोडून टाकू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे. या घरा संदर्भात आरजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात ही घरे मोडली जातील असे म्हटले आहे त्यावर आजगावकर यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

पेडणे हीच माझी कर्मभूमी आहे. त्याठीकाणी काम केले नाही असे एकही घर नाही. यापुढे विधानसभा निवडणूक लढविल्यास पेडणेतूनच निवडणूक लढणार असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनाही आव्हांन देताना गोव्यात 40 टक्क्यांपेक्षा अधिक घरे बेकायदेशीर आहेत. दवर्ली येथील त्या घरांवर करवाई करायची असेल तर राज्यातील सर्व अशा बेकायदेशीर घरांवर कारवाई करा असा इशारा दिला. मडगाव येथे मोतीडोंगर, आझाद नगरी, कारगिल अशा बेकायदेशीर वस्त्या आहेत. जो न्याय दवर्लीला लागू होत असेल तोच न्याय मोती डोंगरावरील घरांना का लागू होत नाही असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

दवर्ली येथे जी घरे बांधली ती तांत्रिक दृष्ट्या बेकायदेशीर हे जरी खरे असले तरी पंचायत कायद्याच्या १५३ कलमाखाली त्यांना 'ईएच' नंबर देता येतो. दवर्ली घर क्रमांक प्रकरण पंचायत सचिवांनी पंचायत संचालकांपर्यंत पोहोचविले. त्यावेळीं पंचायत संचालक सिद्धी हलर्णकर यांनी या घरांना ईएच क्रमांक देता येतात अशी स्पष्ट ग्वाही दिली. असे असतानाही पंचायत या बाबतीत का निर्णय घेत नाही हेच कळत नाही. या घरांना आम्ही क्रमांक देत नाही असा ठराव पंचायतीने घेतला तरी हरकत नाही. मी सरपंचांना तेच सांगितले. मी त्यांना कुठलीही धमकी दिलेली नाही असे ते म्हणाले.

ज्या कायद्याखाली मी या घरांना नंबर देण्याची मागणी करत आहे तो कायदा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी आणला होता. आता घरांना क्रमांक देण्यास विरोध करतात त्या विश्वजीत राणे यांनी स्वतः या कायद्याच्या बाजूने मतदान केले होते. या कायद्याचा आधार घेऊन 30 हजारापेक्षा अधिक घरांना नंबर मिळाले आहेत. सत्तरी तालुक्यातील कित्येक घरांना असे नंबर मिळाले आहेत. घरांना असे नंबर द्यायचे नसतील तर कायदा बदला. पण कायदा अस्तिवात असताना त्याचा फायदा घेण्यापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही. 'सबका साथ सबका विकास' हे जर भाजप सरकारचे धोरण असेल तर त्याचा फायदा दवर्लीतील लोकांना का मिळू शकत नाही असा सवाल त्यांनी केला.

भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी या विषयावर आजगावकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना कोण हा अँथनी असा सवाल करत त्यांच्या या कृतीबद्दल त्याच्यावर कारवाई का होत नाही याचे उत्तर प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनीच द्यावे असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT