Azad Maidan Dainik Gomantak
गोवा

Azad Maidan : ‘आझाद मैदाना’ची विटंबना थांबवा! कारवाईची मागणी ; मोठ्या प्रमाणात कचरा

अनेक परप्रांतीय मद्यपी या स्मारकात झोपलेले आढळतात, अनेक ठिकाणी अस्ताव्यस्तपणे मद्याच्या बाटल्या टाकलेल्या आढळतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Azad Maidan : पणजी, आझाद मैदान हे गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक आहे. परंतु या स्मारकाचे ज्या स्वरूपात पावित्र्य राखले गेले पाहिजे त्या पद्धतीने राखले जात नाही, ही शोकांतिका आहे.

अनेक परप्रांतीय मद्यपी या स्मारकात झोपलेले आढळतात, अनेक ठिकाणी अस्ताव्यस्तपणे मद्याच्या बाटल्या टाकलेल्या आढळतात.

अनेकजण परप्रांतीय आपले कपडेदेखील येथे वाळत घालतात. मोठ्या प्रमाणात कचरादेखील या ठिकाणी पाहायला मिळतो. पणजीच्या मध्यभागी आणि पोलिस मुख्यालयासमोरच्या स्मारकात चाललेल्या या अंदाधुंदीकडे प्रशासनाचे लक्ष का जात नाही?

असा सवाल केला जात आहे. आझाद मैदानावर मनपाकडून सफाई केली जाते; परंतु त्यातही अडसर केला जातो.

स्मारकाचे पावित्र्य जपावे

देश-विदेशातील महनीय व्यक्ती या ठिकाणी गोव्याच्या मुक्तीसाठी वंदन करण्यासाठी येथे येतात. गोमंतकाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या महावीरांना स्मरणात उभारलेल्या या स्मारकाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.

अनुचित कृत्य रोखावे

या स्मारकाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे अपकृत्य घडू नये यासाठी तसेच स्मारकाचे प्रावित्र्य अबाधित राखण्यासाठी सरकारने येथे एक कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नेमणे गरजेचे आहे.

त्यासोबत अशाप्रकारचे अनुचित कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.वाळपई : नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील गाळे लिलावात काढण्यात आलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

Monthly Numerology Prediction September 2025: सप्टेंबर महिन्यात मूलांक 1 ते 7 पर्यंतच्या लोकांचे नशीब उजळणार, मोठा धनलाभ होणार; मान-सन्मान वाढणार!

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT