पणजी: राज्यात पुढील महिन्यापासून 41 ठिकाणी आयुर्वेदिक केंद्रे सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. दरम्यान, येत्या 8 डिसेंबर रोजी आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगीतले.
(AYUSH Hospital will be inaugurated on December; Chief Minister Dr. Pramod Sawant)
गोव्यातील आरोग्य संचालनालय सर्व क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा हाताळते. त्यामुळे या संचालनालयावरील ताण वाढत आहे. गोव्यात होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्र्वभूमीवर सरकार होमिओपॅथी व आयुष वैद्यकीय सेवांसाठी वेगळे संचालनालय सुरू करणार असल्याचे जलस्रोत मंत्री तसेच शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय व इस्पितळाचे संस्थापक संचालक सुभाष शिरोडकर यांनी सांगितले होते.
600 विद्यार्थ्यांचा कॅम्पस
पेडणे येथील आयुष इस्पितळ, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होईल. येत्या डिसेंबरमध्ये आयुर्वेदिक शिक्षण संस्थांचे उद्घाटन तेथे केले जाईल. तेथे 600 विद्यार्थ्यांचा कॅम्पस असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग व आयुर्वेद संपूर्ण जगात पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.