Ayurvedic Physician Shambhu Naik, Santosh Naik Dainik Gomantak
गोवा

Ayurvedic Medicines : आयुर्वेदिक औषधे ठरतात वरदान; अनेक रुग्णांचे आजार बरे

वैद्य शंभू नाईक, संतोष नाईक : आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी उपचार

दैनिक गोमन्तक डिजिटल

एकनाथ खेडेकर

आयुर्वेदाला मोठा इतिहास असून विज्ञानात मोठी प्रगती होऊनही आधुनिक युगात लोकांचा आयुर्वेदाकडेही कल आहे. ग्रामीण भागात आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करून विविध रुग्णांवर उपचार करणारे वैद्य अजूनही कार्यरत आहेत.

नागझर-कुर्टी येथील संतोष नाईक व त्यांचे 90 वर्षीय वडील शंभू नाईक यांनी तयार केलेली आयुर्वेदिक औषधे रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

शंभू नाईक यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांना आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचे आजार बरे झाले आहेत. कावीळ, मूतखडा व अन्य आजारांवर औषधे त्वरित उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यासाठी जंगलात जाऊन औषधी वनस्पतींपासून औषधे घरी तयार केली जातात. अधिकतर तयार केलेली औषधे पोटात घेण्यासाठी असतात.

शंभू नाईक व संतोष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेवर औषधे घेतल्यास रुग्णांना काही वेळातच आराम मिळत असल्याचे रुग्ण सांगतात. शंभू नाईक यांनी केलेल्या समाजसेवेची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांचा सत्कार केलेला आहे.

नव्वद वर्षीय शंभू नाईक यांनी यापूर्वी आयुर्वेदिक औषधे देण्यात सुरुवात केली होती. शंभू नाईक यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले खरे; पण अजूनही १ ते ३० पर्यंतचे पाढे दररोज उच्चार करीत असतात. तसेच पोर्तुगीज १ ते १०० क्रमांक गुणगुणत असतात. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शंभू नाईक यांनी आपल्या आरोग्यावर सतत वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधांचा वापर करून स्वतः अनुभव घेतल्यानंतर इतरांना औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

वडिलांच्या पावलावर पाऊल

बदलत्या काळात शंभू नाईक यांचे सुपुत्र संतोष नाईक यांनीही आपल्या वडिलांकडून औषधे तयार करण्याचे धडे घेतले आहेत. गेल्या ४-५ वर्षांपासून संतोष नाईक हे स्वतःच वनस्पतींपासून औषधे तयार करतात. परिचय असलेले अनेक लोक त्यांच्या घरी औषधे नेण्यासाठी येतात. या औषधांपासून रुग्णांना गुण मिळत असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची रुग्णसेवा वाखाणण्याजोेगी आहे.

वडिलांनी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून हजारो रुग्णांना बरे केले आहे. एक परंपरा म्हणून आपण या सेवेत सामावून घेतले आहे. यामुळे काही प्रमाणात लोकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध होते. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच विदेशातही तयार केलेली औषधे नेण्यात येतात. औषध घेतल्यानंतर रुग्ण बरा होत असल्याने अधिक समाधान मिळते.

- संतोष नाईक, वैद्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT