Ayodhya Ram Mandir Dainik Gomantak
गोवा

Ayodhya Ram Mandir: गोव्यात भाजपचा रामनामाचा जयघोष; काँग्रेस मात्र हतबल

दैनिक गोमन्तक

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त साधून सत्ताधारी भाजपने देशभर चालविलेल्या राष्ट्रचेतनेच्या वातावरणात गोवाही न्हाऊन निघाला आहे. भाजपच्या मंत्री-आमदारांनी त्यांना आखून दिलेला कार्यक्रम झटून कृतीत आणण्यास सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचा हा कार्यक्रम जनतेमध्ये लोकप्रिय होत असतानाच कॉंग्रेस व इतर विरोधी पक्ष मात्र हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपने धर्मकारणाला राष्ट्रवादाची जोड दिली आहे व ते हाच राजकीय कार्यक्रम बनवून राबवत आहेत; तर दुसऱ्या बाजूला या त्यांच्या मतप्रवाहाला प्रतिवाद करणारा कोणताच कार्यक्रम कॉंग्रेस पक्षाकडे आहे, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम जन्मभूमीचा कार्यक्रम भाजपने राष्ट्रीय प्रणालीचा भाग बनवून राज्यांना व सर्व नेत्यांना राष्ट्रचेतना निर्माण करण्यास सांगितले आहे. नेते कार्यक्रम कसा राबवतात, याकडे दिल्लीचे बारीक लक्ष आहे, त्यामुळे नेत्यांना झटून काम करण्याशिवाय पर्याय नाही.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून कोणी आपल्या मतदारसंघात दिवाळीसदृश वातावरण तयार केले आहे, कोणी रांगोळ्या काढल्या आहेत, तर कोणी मंदिर सफाईचा संकल्प सोडला आहे.

‘‘नेत्यांना मंदिर सफाईचे फोटो काढून ते अपलोड करण्यास सांगण्यात येते. केंद्रीय नेत्यांचे लक्ष असल्याने सारे हा कार्यक्रम तत्परतेने कार्यवाहीत आणत आहेत. बाबूश मोन्सेरातही त्यात सामील झाले आहेत, हे लक्षणीय आहे,’’ अशी माहिती एका भाजप नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.

राम मंदिराच्या रूपाने देशात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले आहे, या धर्मभावनेचे रूपांतर ‘राष्ट्रभावनेत’ झाल्याने भाजपला त्याचा जरूर राजकीय फायदा मिळेल; परंतु भाजपने राम मंदिराच्या निर्माणात त्यागही खूप केला आहे. त्यामुळे त्यांना या भावनेचा फायदा घेण्याचा जरूर अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

राष्ट्रचेतना निर्माण करण्याचे नेत्यांना आवाहन

राज्यात दिवाळीचा माहोल

पणजी कदंब बसस्थानकासमोरील चौकात राम, लक्ष्मण व सीता यांच्या प्रतिमा उभारून सुशोभीकऱण केले आहे. मांडवी पुलाच्या पर्वरीकडील बाजूला दिवाळीला टांगतात, तसे मोठे कंदील टांगले आहेत. मडगावच्या रवींद्र भवनात सलग तीन दिवस भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी बँकांना सुटी

अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी राज्य सरकारने सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयांना सुटी लागू केली होती. मात्र, आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बँकांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा, बँका आणि इतर आस्थापनेही सोमवारी बंद असतील.

कॅसिनोही राहणार बंद : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत कॅसिनोमधील गेम्स बंद राहणार आहेत. कॅसिनोमालकांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. चारनंतर कॅसिनोचे कामकाज पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

झेंडे, कुर्त्यांचे वाटप; महाप्रसादाचे आयोजन

मंत्री व आमदार यांच्या पातळीवरही अयोध्येतील सोहळा स्थानिक पातळीवर साजरा कऱण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राम नाम लिहिलेल्या कुर्त्यांचे वाटप, झेंड्यांचे वाटप सुरू केले आहे. त्याशिवाय अनेक मंदिरांत यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. स्वत: नेतेमंडळीही या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत आहेत.

भाजपने देशात ‘रामराज्य’ आणण्याचे वचन दिले होते, परंतु ते आणण्याचे सोडा, लोकशाहीतील ‘राज्या’लाच संपविण्यात आले आहे. त्यामुळे ही नाटके जनता जाणून आहे.

- गिरीश चोडणकर, कॉंग्रेस नेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT