Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत बुधवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

तापमान वाढतेय, सावधगिरी बाळगा

दैनिक गोमन्तक

डिचोली: सध्या तापमान प्रचंड वाढले असून कमाल तापमान 4 सेल्सियसने वाढले आहे. उष्णता वाढत राहणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या उष्म्यापासून आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि असह्य उकाड्याचा सामना कसा करावा. त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जागृती कार्यक्रम येत्या बुधवारी (ता. 16) डिचोलीत आयोजित करण्यात आला आहे.

डिचोली लायन्स क्लब आणि भारतीय वैद्यकीय संघटनेच्या सहकार्याने डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे दुपारी 3.30 वा. लायन्स सभागृहात (हिराबाई झांट्ये सभागृह) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे डॉ. शेखर साळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमांतर्गत पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर हे बदलत्या हवामानाविषयी उपयुक्त माहिती देणार आहेत. डॉ. साळकर यां ‘हिट वेव्ह’ची लक्षणे आणि परिणाम याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मेणकुरे, साळ, वन-म्हावळींगे सर्वण आणि अन्य भागातील लोकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे तापमानातवाढ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: मच्छीमारी ट्रॉलर चालणार आता 'हायड्रोजन'वर; डिझेल दरवाढीतून मुक्तता, मासेमारी क्षेत्रात नवे पर्व होणार सुरु

Goa Police: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ‘स्वस्थ पोलिस, सशक्त पोलिस’ उपक्रम; गोवा पोलिसांचे पाऊल

Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

Goa Assembly Elections 2027: आगामी विधानसभेसाठी भाजपचा जनसंपर्कावर विशेष भर; आदिवासी आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रबिदू

SCROLL FOR NEXT