Indian festival Dainik Gomantak
गोवा

भारतीय उत्सव परंपरेबाबत वेर्ला येथे 'जनजागृती'

पाककला स्पर्धाही घेण्यात आली.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: वेर्ला येथील आध्या महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रीती आगरवाडेकर यांच्या पुढाकाराने नाईकवाडा, वेर्ला-म्हापसा येथे भारतीय उत्सव परंपरेच्या महतीबाबत जनजागृती करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून वालावलकर उच्च माध्यमिकचे माजी प्राचार्य अनिल सामंत उपस्थित होते.

मंडळाच्या सचिव मृणालिनी केरकर यांच्या निवासाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात महिलांतर्फे फुगडी नृत्य, नाट्य दिग्दर्शक रोहिदास जोशी यांच्या संयोजनाखाली नाटिका, तसेच काही खेळांचे सादरीकरण झाले. यानिमित्ताने पाककला स्पर्धाही घेण्यात आली.

सन्माननीय अतिथी म्हणून उज्ज्वला फडके व ब्रह्मकुमारी ममता, ब्रह्मकुमारी गायत्री हिरोजी यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल सामंत म्हणाले, भारतीय उत्सव परंपरेला फार मोठी महती लाभली आहे व त्या उत्सवांना वैज्ञानिक अधिष्ठानही लाभले आहे. ब्रह्मध्वज, राष्ट्रध्वज आणि आत्मध्वज या तत्त्वांचा पुरस्कार त्या उत्सवांतूनहोत असतो.महिलांवर नेहमीच कामाचा ताणतणाव असतो व त्यांना अभिव्यक्तीसाठी मुक्त व्यासपीठ देण्याच्या हेतूने या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे या वेळी प्रीती आगरवाडेकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT