Dolphin In Goa Dainik Gomantak
गोवा

Panaji News : डॉल्फिनसह सागरी जीव वाचवण्यासाठी जागृती हवी : पूजा मित्रा

गोमन्तक डिजिटल टीम

धीरज हरमलकर

Panaji News :

पणजी, गोव्यातील सागरी हद्दीत आढळणाऱ्या डॉल्फिनच्या प्रजातीचे संरक्षण देण्यासाठी आताच पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकजागृती करणे आवश्‍यक आहे, असे मत टेरा कॉन्शसच्या संस्थापक पूजा मित्रा यांनी व्यक्त केले.

राज्याच्या सागरी हद्दीत डॉल्फिनची दुर्मिळ प्रजातीचा वावर असून या प्रजातीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तातडीने राबवायला हवा, असे मित्रा म्हणतात.

सागरी जीव सध्या अनेक मानव निर्मित संकटांना तोंड देत आहेत. त्यांचा बचाव तसेच संवर्धन आवश्‍यक आहे. अनेकदा सागरी जीव येऊन किनाऱ्यावर अडकतात. समुद्री पक्षी, कासव, डॉल्फिन आदी किनारपट्टीवर अडकल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत.

अशा जिवांना सुरक्षितता प्रधान करणे आवश्‍यक आहे. तसेच एखादा जीव जखमी आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उभारणे आवश्‍यक आहे, असे मित्रा यांनी सांगितले.

समुद्रही गोव्याचा भाग...

मित्रा त्यांनी पुढे सांगितले की, समुद्र किनाऱ्याच्या पलीकडे असलेला भाग म्हणजे गोवा नव्हे. गोव्याच्या भूभागाला लागून असलेल्या किनाऱ्यापासून समुद्र हद्दीपर्यत गोवा पसरलेला आहे. या समुद्रात गोव्याचे सागरी जीवन वसते आहे, येथील परिसंस्थेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण आवश्‍यक आहे.

सागरी पर्यटनावर नियंत्रण हवे

मित्रा यांनी डॉल्फिनच्या संवर्धनासाठी नेमकी काय पावले उचलणे आवश्‍यक आहे, यावर प्रकाश टाकला.

बोट ऑपरेटर आणि वॉटर स्पोर्ट ऑपरेटर्सना पर्यटन व्यवसाय करताना सागरी प्रजातींवरील येणारा ताण कमी करण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. तसेच हंपबॅक डॉल्फिन्ससारख्या लुप्तप्राय प्रजातीला संरक्षण देताना यापुढे या पर्यटन व्यावसायवर नियंत्रण ठेवणेही आवश्‍यक आहे.

फक्त कासव संवर्धन पुरेसे नाही

फक्त कासवाच्या घरट्यांवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. गोव्यात प्रवाळ खडक, खेकडे, मगरी आदी वन्यजीव आहेत. संवर्धनाचे प्रयत्न सर्व या प्रजातींसाठीही होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी राज्यव्यापी जनजागृती आवश्यक आहे, असे मित्रा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT