Avedem Panchayat Dainik Gomantak
गोवा

Avedem Panchayat: ‘ऍडिंको’ विस्ताराच्या विरोधात स्थानिक आक्रमक; न्यायालयात जाण्याचा इशारा

Avedem Gram Sabha: या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला असतानाही विद्यमान पंचायत मंडळाने विस्तारासाठी परवाना दिला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: अवेडे येथील ‘ऍडिंको ’ इंडस्ट्रीजच्या विस्ताराला ग्रामस्थांनी रविवारी (ता.४) झालेल्या ग्रामसभेत विरोध केला. या कंपनीचा विस्तार झाल्यास गावात प्रदूषण वाढेल, त्यामुळे पंचायतीने हे काम रोखावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कंपनीच्या विस्ताराविरोधात पंचायत उच्च न्यायालयात जाणार असल्याची ग्वाही सरपंच भूपेंद्र देसाई यांनी ग्रामस्थांना दिली.

अवेडे-पारोडा, अवेडे-कोठंबी पुलाची पाहणी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी या पुलावरून वाहते. त्यामुळे लोकांची गैरसोय होते. यंदा आलेल्या पुरात दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते.

त्यामुळे त्यांची स्थिती नाजूक झाली आहे. यावर पंचायतीने लक्ष घालण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन करू नये यासाठी तसेच रोमी कोकणी लिपीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, असा ठरावही यावेळी घेण्यात आला.

‘ऍडिंको ’ इंडस्ट्रीजच्या विस्ताराबाबत माजी सरपंच आलेलुया आल्फाेन्‍सो म्हणाले, जेव्हा मी सरपंच होतो, तेव्हापासून या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. असे असतानाही विद्यमान पंचायत मंडळाने विस्तारासाठी परवाना दिला आहे.

पंचायतीकडून योग्य प्रक्रियांचे पालन केले जात नाही. कायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करून पंचायतीने बांधकाम परवाना जारी केला आहे. त्याद्वारे हे बेकायदा बांधकाम केले जात आहे.

पंचायतीकडून लोकांची दिशाभूल

लोकांची दिशाभूल करून अवैध परवाना जारी करणे हे गावाच्या हिताविरोधात आहे. या प्रकरणात काही लोकांचा हात असू शकतो. पंचायतीने या प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याचे आश्वासन दिले आहे, असे आल्फाेन्‍सो यांनी सांगितले.

पंचायतीने योग्य लक्ष घालून लोकांना न्याय द्यावा. अवेडे-कोठंबी पदपुलाच्या सुरक्षिततेबद्दल तपासणी करण्‍याची मागणी विशाल देसाई यांनी केली. तेथे अपघात झाला तर स्‍थानिक लोक पंचायतीला जबाबदार धरतील, असेही देसाई म्‍हणाले.

अवेडे येथील ‘ऍडिंको ’च्या विस्ताराला जो परवाना दिला आहे, तो पंचायत उपसंचालकांकडून आलेल्या निर्देशानुसार दिला आहे; परंतु त्याला आता उच्च न्यायालयात आम्ही आव्हान देणार आहोत. अवेडे-पारोडा, अवेडे-कोठंबी पुलाची तपासणी करण्यासाठी साबांखाला पत्र लिहिणार आहोत. अवेडे तळ्याजवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, ते चोरीला गेले आहेत. त्याबाबत आम्ही यापूर्वीच पोलिसांना कळविले आहे.
भूपेंद्र देसाई, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT