आज झालेल्या ग्रामसभांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
अवेडे कोठंबी ग्रामसभा
अवेडे कोठंबी ग्रामसभेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. Adinco Industries च्या डिस्टिलरी कारखान्यासाठी सध्या गावातील खाजगी जागेत खोदकाम सुरू आहे. कारखान्याच्या वीजवाहिनीसाठी केलेल्या खोदकामाला नागरिकांनी ग्रामसभेत विरोध दर्शवला.
ग्रामपंचायतीची परवानगी न घेता हे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी अशा कोणत्याही खोदकामासाठी आपण परवानगी देणार नसल्याचे आश्वासन सरपंचांनी दिले.
तसेच कचरा समस्येवरही आज चर्चा झाली. योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून कचरा कर गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी सौर उर्जेवर चालणारे दिवे चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. तपासाअंती यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. हा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित झाल्यानंतर, सदर मुलांच्या पालकांशी आधी चर्चा करून मग त्या मुलांवर कारवाई करण्यात यावी, असे मत व्यक्त करण्यात आले.
चिखलीमधील घरांचे होणार पुनर्मूल्यांकन!
चिखली ग्रामसभेने घरांच्या पुनर्मूल्यांकनावर भर दिला आहे. घराच्या पुनर्मूल्यांकनामुळे पंचायतीचा महसूल सुमारे 7 पट वाढेल, अशी माहिती सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दिली.
'नो पार्किंग'मध्ये वाहने लावणाऱ्यांवर होणार कारवाई!
मुख्य रस्त्यावर तसेच किनारी भागातल्या नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मोरजी ग्रामसभेचे संकेत. रस्त्याशेजारी लावलेले हॉटेल्सचे बोर्ड काढण्यासाठी पंधरा दिवसांची दिली मुदत. जिल्हा पंचायत निधीतून होणाऱ्या विकास कामांवरही झाली चर्चा.
नव्या महामार्ग आराखड्यासाठी भोमा पंचायतीचा ठराव!
भोमा आडकोण ग्रामसभेत गावातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रस्थावित आराखडा रद्द करुन नव्याने करण्याबाबत ठराव संमत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी करणार पत्रव्यवहार. ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील कुंडई औद्योगीक वसाहतीतील प्रदूषणाचाही मुद्दा ग्रामस्थांकडून उपस्थित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.