Available Water Storage In Dams Of Goa
Available Water Storage In Dams Of Goa Dainik Gomantak
गोवा

Dams In Goa: दोन धरणांत 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा; राज्याच्या धरणांतील पाणीसाठा जाणून घ्या

Pramod Yadav

Available Water Storage In Dams Of Goa: पावासाळा सुरू होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशात गोव्यातील दोन धरणांतील पाणीसाठी दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठी पावसाळ्यापर्यंत पुरेल असा विश्वास जलस्त्रोत खात्याने व्यक्त केला असून, चिंतेचे कारण नाही असे म्हटले आहे.

राज्यातील अंजुणे, पंचवाडी आणि साळावली धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अंजुणे, पंचवाडी धरणातील पाणीसाठी तर 10 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडल्यास पाणी पुरेल का अशी चिंता सध्या नागरिकांना सतावत आहे. मात्र, जलस्त्रोत खाते पाणी पुरेल असा दावा करत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठी

अंजुणे 23.8 टक्के, पंचवाडी 4.5 टक्के, साळावली 23.80 टक्के, आमठाणे 51.8 टक्के, तिलारी 96 टक्के, गावणे 40.1 टक्के आणि चापोली 44.7 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. विविध भागात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होत आहे.

हरमल पंचायत क्षेत्रात वरचावाडा परिसरात मागच्या दोन-चार महिन्यांपासून पाण्याचा लपंडाव सुरू आहे. नळांना पाणी येत नाही. परंतु पाण्याची बिले नियमित येतात. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करतानाही मतभेद केला जात आहे.

यावर सरकारने योग्य तो तोडगा काढून दिवसाआड किमान दोन तास तरी आम्हाला पाणीपुरवठा करावा. चार दिवसांच्या आत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी विभाग पेडणे कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा स्थानिक पंच रजनी इब्रामपूरकर यांनी ग्रामस्थांतर्फे दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT