Congress In Goa Dainik Gomantak
गोवा

'काँग्रेसला गोव्यात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न'

अमित पाटकर: लोकसभेसाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारणार

दैनिक गोमन्तक

खास प्रतिनिधी

गोवा: प्रदेश काँग्रेस समितीची नवी कार्यकारिणी म्हणजे गोव्यात पक्षाला नवीन आणि तजेलादार चेहरा देण्याचा केलेला प्रयत्न असून पक्षात नवीन कार्यकर्त्यांची भर घालून काँग्रेसला राज्यात नवसंजीवनी देण्याचा आता प्रयत्न केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नवीन अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा हा संक्षिप्त गोषवारा. तुमची प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

हे पद स्वीकारल्यावर तुम्हाला कसे वाटते?

निश्चितच आनंद झाला आहे, मात्र एक जबाबदारी आता खांद्यावर आली आहे आणि ती चांगल्यारीतीने निभावणे हे माझे आता कर्तव्य आहे, ही भावनाही मनात निर्माण झाली आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, दिनेश गुंडू राव तसेच अन्य नेत्यांचा मी ऋणी आहे.

बहुतेक सगळेच पदाधिकारी तरुण वाटतात. असे का?

उत्तर: गोव्यात काँग्रेसला नवीन आणि तजेलादार चेहरा देण्याचा हा प्रयत्न आहे. आता दोन वर्षात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी आम्हाला गोव्यात भरीव कामगिरी करायची आहे. त्यादृष्टीने मजबूत संघटन बांधून काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. गोव्यात काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीने आमची पुढील वाटचाल असेल.

पण या नेमणुका जाहीर करण्यासाठी एव्हढा उशीर का? आणि त्याही दिल्लीतून का केल्या गेल्या?

भाजपचे 20 आमदार निवडून येऊनही त्यांना सरकार स्थापन करण्यापूर्वी कितीवेळा दिल्लीवाऱ्या कराव्या लागल्या हे तुम्ही पाहिले नाही का? एक लक्षात घ्यायला हवे, की काँग्रेसचे जे 11 आमदार निवडून आले आहेत, त्यापैकी आठ म्हणजे 75 टक्के आमदार नवीन आहेत. त्यामुळे सर्व प्रणाली समजून घेण्यासाठी थोडा वेळ जाणे अपेक्षित आहेच. बहुतेक सगळेच नवीन असल्याने नेता निवडण्याचे काम केंद्र समितीने करावे, असे वाटले तरी त्यात काही आश्चर्य करण्यासारखे नाही.

भाजप सरकारला तुम्ही तोंड कसे द्याल?

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि आरजी हे चारही पक्ष गोव्यात सकारात्मक विरोधकांचे निश्चितच संघटितपणे काम करणार आहेत. सरकार जर चुकत असेल तर त्यांना विधानसभेत आमचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो, ज्येष्ठ नेते दिगंबर कामत, याशिवाय अन्य आमदार त्यांना जाब विचारणार आहेतच. सरकार चुकत असेल तर त्यांना विधानसभेबाहेर चूक दाखवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत. आम्ही लोकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करू याची मला खात्री आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT