Attempt to develop Goa like Delhi AAP government in 2027  Dainik Gomantak
गोवा

दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास घडवण्याचा प्रयत्न, 2027 मध्ये आपचं सरकार

दैनिक गोमन्तक

खांडोळा : विधानसभा निकालाला दहा दिवस झाले, पण गोव्यात अद्याप सत्ता स्थापन करण्यात आली नाही. पंजाबमध्ये आपने सरकार स्थापन केले, विकास कामाला सुरूवात झाली, पण गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री ठरलेला नसल्यामुळे सरकार स्थापण्यात दिरंगाई चालली आहे. फक्त दिल्लीवाऱ्या सुरू आहेत, अशी टिका आपचे संयोजक राहुल महांबरे यांनी माशेल येथे केली.

माशेल येथील नोनू व्हिलेजमध्ये आपच्या नवनिर्वाचित आमदारांचा (MLA) सत्कार समारंभ आयोजित केला होता. व्यासपीठावर बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, वेळ्ळीचे क्रुझ सिल्वा यांच्या गौरवप्रसंगी राहुल महांबरे, नोनू नाईक, माजी मंत्री महादेव नाईक, जिल्हा पंचायत सदस्य हेन्झेल फर्नांडिस उपस्थित होते.

महांबरे पुढे म्हणाले, राज्यात अनेक कामे ठप्प झाली आहेत. रस्ता, पाणी, वीजेच्या समस्या आहेत. सत्ता स्थापन करण्यापेक्षा चाय पिया, सामोसा खाया याचाच बोलबोला भाजपचे (BJP) आमदार करीत आहेत. त्यांना सामान्य जनतेबद्दल काहीच वाटत नाहीत.

सत्काराला उत्तर देताना व्हेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा म्हणाले, आम आदमी पक्षाची ही सुरुवात आहे. सर्वसमान्यांचा विकास करणे हेच आपले ध्येय असून दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात आपले बहुमताचे सरकार 2027 मध्ये निश्चितपणे येणार आहे. आम्ही स्वच्छ शासन आणि गोव्याचा सर्वांगिण विकासाठी कार्य करणार.

महादेव नाईक म्हणाले, पक्षाचे दोन आमदार विधानसभेत दाखल झालेत. तेव्हा भविष्यात आपचे बहुमताचे सरकार येण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न करावे. महिला, युवकांचासाठी योजना राबवाव्या. संपूर्ण गोव्यातील (goa) जनतेसाठी या दोन्ही आमदारांनी कार्य करावे.

यावेळी आपचे विविध मतदारसंघातील विधानसभा निवडणुक (Assembly Election) लढविलेले उमेदवार उपस्थित होते. प्रा. रामराव वाघ, राजेश कळंगुटकर, गोरखनाथ यांना ओळख करून दिली. रुपेश मावळिंगकर यांनी सूत्रसंचालन केले. नोनू नाईक यांनी प्रास्ताविक केले. मनोजकुमार घाडी यांनी आभार मानले.

शिरोड्यात सत्कार करणार

शिरोडा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या (AAP) दोन्ही आमदारांचा भव्य सत्कार लवकर करण्यात येणार आहे. शिरोड्यातील आपच्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. कारण हो दोन्ही आमदार (MLA) गोव्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत, असे महादेव नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT