Detention Centre  Dainik Gomantak
गोवा

म्हापसा डिटेन्शन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न

कैद्यांनी सेंटरचा आतील दरवाजा बंद ठेवला होता.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा डिटेन्शन सेंटरच्या छपराची दुरवस्था झाली आहे. छापरची कौले फुटलेली आहेत. ही कौले दुरुस्त करण्याची मागणी येथील कैद्यांनी केली होती. मात्र, आपल्या मागणीची पूर्तता होत नसल्याने या सेंटरच्या 9 कैद्यांनी गोंधळ घातला. सेंटरचे गेट बंद करून कर्मचार्‍यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या कर्मचार्‍यांची सुटका करण्यात आली नव्हती. (Mapusa Detention Center Latest News)

सोमवारी दुपारपासून हा प्रकार सुरू झाला. कैद्यांनी सेंटरचा आतील दरवाजा (Door) बंद ठेवला होता. संध्याकाळी 7 वा. कर्मचार्‍यांची सेवा समाप्त होते. पण या कैद्यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला नाही. त्यामुळे ड्युटीवर जाणारे दुसर्‍या पाळीच्या कर्मचार्‍यांना गेटबाहेरच ताटकळत राहावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी घडली. म्हापसा (Mapusa) डिटेन्शन सेंटर मधील एका खोलीच्या छपराची कौले फुटली होती. कैद्यांनी खोलीतील कौलांची दुरुस्ती करण्याची मागणी अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, ही मागणी पूर्ण झाली नाही. मागणी करणाऱ्या कैद्याने ही घटना आपल्या सहकारी कैद्यांच्या कानावर घातली. सर्व कैद्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना जाब विचारला. वेळेवर औषधोपचार दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT