ATS Mock Drill Dainik Gomantak
गोवा

ATS Mock Drill: दहशतवाद विरोधी पथकाचे वागातोर येथे रात्रीचे मॉक ड्रिल

तीन दहशदवादी निकामी

गोमन्तक डिजिटल टीम

दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-terrorism Squad) (ATS) वागातोर येथे रात्रीचे मॉक ड्रिल (Night Mock Drill) केले. शुक्रवारी (23 ऑगस्ट) रात्री 8.45 ते 10.20 यावेळेत वागातोर येथील डब्लू हॉटेलमध्ये (W Hotel) हे मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी एक हॉस्टेज परिस्थिती तयार करण्यात आली. ज्यामध्ये तीन शस्त्रधारी अतिरेक्यांनी हॉटेलचा ताबा घेतला आणि या विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत मोहिम फत्ते केली.

हणजूणे पोलिसांनी (Anjuna Police) यावेळी डब्लू हॉटेलच्या बाहेर चोक बंदोबस्त ठेवत, बघ्यांची गर्दी नियंत्रित केली. ऑपरेशन परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. दहशतवाद विरोधी पथकातील एक टिमने दहशतवाद्यांना निकामे केले तर, दुसऱ्या टिमने हॉटेल परिसराचा तपास केला. या मॉक ड्रिलच्या वेळी एक जवान गंभीर जखमी झाला, शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या जखमी जवानावर उपचार करण्यात आले.

ATS Mock Drill

मॉक ड्रिल दरम्यान जवानांनी ज्या समस्यांचा सामना केला याची माहिती घेण्यात आली. वायरलेस स्टेशनला मॉक ड्रिलचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच, हॉटेलला मॉक ड्रिल दरम्यान कोणतेही नुकसान झाले नाही अशीही माहिती देण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक यांच्यासह हणजूणे पोलिस, शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT