ATS Mock Drill: वर्षाअखेर आणि सणांची रेलचेल यामुळे सध्या पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये गोव्या सारख्या पर्यटन राज्यात हजारो देशी-विदेशी पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत असतात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहशतवाद विरोधी पथक (Anti-Terrorism Squad) (ATS) आणि गोवा पोलिसांनी (Goa Police) संयुक्तविद्यमाने पणजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये मॉक ड्रिल केले. पथकाने हॉटेलमध्ये लपलेल्या दहशवाद्यांना पकडून अटक केले.
"दहशतवाद विरोधी पथक वारंवार अशाप्रकारच्या ड्रिल करत असतात. यातून भविष्यातील अनुचित प्रकाराबाबत आपली तयारी, त्यासाठी आवश्यक प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ याची चाचपणी केली जाते. दहशतवाद विरोधी पथकाला राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान प्रशिक्षण देत असतात. कोणत्याही प्रकराची दहशतवादी कारवाई किंवा अनुचित घटना रोखण्यासाठी हे पथक सक्षम असते." असे गोव्याचे पोलिस महानिरिक्षक जसपाल सिंह म्हणाले.
पेडणे पोलिसांनी देखील दहशतवाद विरोधी पथकाच्या सोबतीने एका हॉटेलमध्ये मॉक ड्रिल केले. बुधवारी केलेल्या या मॉक ड्रिलमध्ये स्थानिक पोलिस अग्निशमन दलाचे जवान देखील सामिल झाले होते. सण-उत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिस, दहशतवादी पथक कसे रिस्पॉन्स करते याची चाचणी केली जाते. पोलिसांना एका हॉटेलमध्ये दहशतवादी आणि बॉम्ब असल्याचा फोन आला. पोलिस, अग्निशमन दल, दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब स्कॉड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब निकामी करून पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक केली. अशी माहिती पेडणे पोलिसांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.