Crime News Dainik Gomantak
गोवा

ATM Fraud: ‘एटीएम’मधून पैसे काढून देतो म्हणाला, रक्कम घेऊन पळाला; अज्ञात व्यक्तीने घातला वास्कोतील दोघांना गंडा

ATM fraud in Vasco: एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची, एका युवकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याच्या तक्रारी वास्को पोलिस स्थानकात करण्यात आल्या आहेत.

Sameer Panditrao

वास्को: एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची व एका युवकाची एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याच्या तक्रारी वास्को पोलिस स्थानकात करण्यात आल्या आहेत. त्या व्यक्तीने मेर्सीज वाडे येथील भास्कर (६४) यांच्या खात्यातून ५७ हजार रुपये तर मेस्तवाडा येथील दुर्गाप्पा (३०) याच्या खात्यातून तीस हजार रुपये काढल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेर्सीस वाडे येथे राहणारे भास्कर हे २६ जून रोजी वास्कोतील कॅनरा बँकेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममध्ये आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने भास्कर यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा केला.

त्यानंतर त्या व्यक्तीने भास्कर यांच्याकडे असलेल्या एटीएम कार्डाची अदलाबदल केली. हा अदलाबदलीचा प्रकार भास्कर यांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने भास्कर यांच्या एटीएम कार्डचा वापर करताना, एटीएममध्ये दोन व्यवहार करून ५७ हजार रुपये काढले.

याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत. अन्य एका घटनेत दुर्गाप्पा हा युवक २६ जूनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्या एटीएममध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याला पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला.

असे करताना त्याने दुर्गाप्पा याच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्या अज्ञात व्यक्तीने नंतर दुर्गाप्पा याच्या एमटीएम कार्डचा तीनवेळा वापर करून प्रत्येकी दहा हजार असे तीस हजार रुपये एटीएममधून काढले. याप्रकरणी उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT