Goa Traffic | Atal Setu | CM Sawant Dainik Gomantak
गोवा

Atal Setu: प्रतिक्षा संपली! दुपारी एक वाजता खुला होणार अटल सेतू

मागील काही दिवसांपासून अटल सेतू बंद असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Atal Setu: मागील काही दिवसांपासून दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असलेला अटल सेतू आज (रविवारी, दि.16) दुपारी एक वाजता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

(Atal Setu Will Be Open For Public Use From Around 1:00 pm Today)

'अटल सेतूच्या सर्व लेन रविवारी दुपारी एक वाजता वाहतुकीसाठी खुल्या केल्या जातील. नागरीकांनी मागील काही दिवसांपासून दाखवलेल्या सहशीलतेबाबत मी त्यांना धन्यवाद देतो. सेतूवरील डांबरीकरण आणि हॉटमिक्सिंगचे काम सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. लोकांना झलेल्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण केल्याबद्दल मी त्यांना देखील धन्यवाद देतो.' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अटल सेतू बंद असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत होती.

अखेर अटल सेतू खुला झाल्याने पणजी, म्हापसा मार्ग आणि रायबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. मागील काही दिवसांपासून मांडवी परिसरात होणाऱ्या कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले होते. दरम्यान, सेतू खुला झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shukra Gochar 2025: पैशांचा पाऊस पडणार! शुक्र गोचरामुळे बदलणार 'या' राशींचे आयुष्य

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT