Nilesh Cabral on Atal Setu Repair  Dainik Gomantak
गोवा

Atal Setu : 'अटल सेतूच्या रस्ते दुरुस्तीला नोव्हेंबरचा मुहूर्त'

सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी नोव्हेंबरमध्ये पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचं पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आदित्य जोशी

पणजी : अटल सेतूवरील खराब रस्त्याचा प्रश्न विधानसभेतही चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अटल सेतूवरील रस्त्याच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी नोव्हेंबरमध्ये पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचं पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे अटल सेतूवरील रस्ते दुरुस्तीला आता नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबरमध्ये अटल सेतूवरील डांबर तसंच काँक्रिट आणि डांबराच्या मध्ये घातलेला एक लेअर काढून कंपनीकडून स्वखर्चाने पुन्हा डांबरीकरण केलं जाणार आहे, असं काब्राल यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र तोपर्यंत पुढील चार महिने वाहनचालकांना मात्र अटल सेतूवरुन जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’चे काम दिवसेंदिवस वादात सापडत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या आरोपानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी प्रत्यक्ष ‘अटल सेतू’वर जाऊन निकृष्ट कामाचे दर्शन घडवत संपूर्ण प्रकल्पाच्या दर्जावर शंका व्यक्त केली होती.

अटल सेतूवरील खड्डे आता नित्याची बाब झाली असून फोंड्याकडे जाणाऱ्या दुभाजकापासून पुढे उतरतीवर सातत्याने अपघात होत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करावी आणि तोपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा असे आवाहन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT