पणजी: काही दिवसांपूर्वी मानोरुग्ण मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, त्यानंतर प्रजासत्ताक दिनी हरमल समुद्रकिनारी एका स्थानिकाचा खून करण्यात आला. वाढत्या गुन्हेगारी घटनांवरुन रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी गोमंतकीयांना आर्त हाक दिली आहे. आत्तातरी आरजी पक्षाला गांभीर्याने घ्या, असे परब यांनी म्हटले आहे.
गोव्यात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांवर लक्ष वेधत मनोज परब यांनी एक्स या सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.
सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आता स्थानिक युवकाच्या खूनाची घटना उघडकीस आली. आत्तातरी आरजी पक्षाला गांभीर्याने घ्या. दिल्लीतील पक्ष गोव्यावर राज्य गाजवायला लागल्यावर ही परिस्थिती आणखी खराब होत जाणार. आरजीने जे जे म्हटले ते आता खरे होत आहे. गोमंतकीय त्यांच्यात राज्यात सुरक्षित नाहीत. तुमचे मत भविष्य ठरवेल. विचार करा...मनोज परब, आरजीपी अध्यक्ष
सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनोज परब यांनी गेल्या आठवड्यात पणजीत पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरजीचा आमदार आता विरोधी पक्षाचा भाग नसून स्वतंत्र असेल, असे जाहीर केले. तसेच, येत्या काळात पक्ष मर्यादीत जागा लढवेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अनुपस्थित असणारे आमदार वीरेश बोरकर यांनी देखील नंतर परबांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला.
लोकसभा निवडणूक आमच्यासाठी डोळे उघडणारी होती, यानंतर काही काळासाठी चिंतन आणि आत्मनिरीक्षण करण्याची गरज भासली, त्यामुळे काही काळ विश्रांती घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, असे परब म्हणाले. पक्षाला राजकीय वारसा आणि पुरेसा निधी नसल्याने निवडणुकीत पराभव झाल्याचे देखील परब यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.