Dharmesh Saglani and Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: साखळीत मुख्यमंत्री सावंत आणि सगलानी आमने-सामने

2012 साली पर्रीकर मुख्यमंत्री असताना डॉ. सावंत यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

साखळी: साखळी हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असल्यामुळे सर्वांचे लक्ष यावर केंद्रीत होणे साहजिकच आहे. साखळीतून डॉ. सावंत हे दोनदा विजयी झाले आहेत. आणि आता तिसऱ्यांदा ते रिंगणात उतरत आहेत. गतवेळी त्यांची लढत साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्याबरोबर होती. आणि त्यावेळी डॉ. सावंत यांनी ही लढत दोन हजाराहून अधिक मताधिक्क्याने जिंकली होती. पुन्हा एकदा सगलानी विरूध्द प्रमोद सावंत (Pramod Sawant) हा सामना रंगणार आहे. (Pramod Sawant Goa Election News)

2012 साली पर्रीकर मुख्यमंत्री असताना डॉ. सावंत यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. तत्पूर्वी झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांना प्रताप गावस यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. पण 2012 मध्ये डॉ. सावंत हे प्रथमच विधानसभेत पोहचले. त्यानंतर 2017 मध्ये अटीतटीच्या लढतीत डॉ. सावंत विजयी झाले. साखळी हा पूर्वीचा पाळी मतदारसंघ तो मगोपचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. 1984 साली कॉंग्रेसतर्फे विजयी झालेले चंद्रकात वेरेकर व 2007 साली विजयी झालेले गुरुदास गावस हे अपवाद म्हणावे लागतील. पण 1999 पासून या मतदारसंघावर भाजपने कब्जा केला. 1999 व 2002 या दोन निवडणुकीत भाजप (BJP) विजयी झाला. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत पाळीचे रुपांतर साखळी मतदारसंघात करण्यात आले. डॉ. सावंत हे तिथून पहिले आमदार ठरले.

साखळी मतदारसंघ साखळी पालिकेबरोबर सुर्ला, वेळगे, हरवळे, कुडणे व आमोणे तसेच पाळी या ग्रामपंचायती येतात. पालिका सध्या कॉंग्रेसकडे असून सगलानी गटाचे या पालिकेवर वर्चस्व आहे.

मुख्यमंत्री हे सध्या भाजपच्या प्रचाराकरिता राज्यभर फिरत असल्यामुळे ते सध्या या मतदारसंघात विशेष फिरताना दिसत नाहीत. पण त्यांचे कार्यकर्ते हा मतदारसंघ पिंजून काढताना दिसताहेत. धर्मेश सगलानी हेही बलाढ्य उमेदवार गणले जात असून ते डॉ. सावंत यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नगरपालिकेतील या दोघांची एकामेंकांवर कुरघोडी करण्याची वृत्ती साखळीवासीयांना चांगलीच परिचित आहे. सत्ता मुख्यमंत्र्यांकडे असूनही सगलानींनी पालिका आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे. आपतर्फे मनोज घाडी आमोणकर हे निवडणूक लढवित असून तृणमूल मगोपयुतीतर्फे पत्रकार महादेव खांडेकर हे रिंगणात उतरले आहेत. खांडेकर हे कॉंग्रेस उमेदवारीकरिता इच्छुक होते. पण ती सगलानींना दिल्यामुळे त्यांनी मगोपमध्ये प्रवेश केला. पण त्यांची मतपेढी ही प्रामुख्याने कॉंग्रेसची असल्यामुळे त्याचा फटका कॉंग्रेसला (Congress) बसू शकतो. ‘आप’बाबतही तेच म्हणता येऊ शकेल.

खान यांची भूमिका बदलेल का समीकरण ?

नुकतेच नगरसेविका अन्सिरा खान यांचे पती रियाज खान यांनी डॉ.सावंत यांना पाठिंबा जाहीर केला.रिजाय खान हे माजी नगराध्यक्ष असून ते सगलानी गटातले एक प्रमुख मोहरे म्हणून ओळखले जात होते. त्यांनी भूमिका बदलल्यामुळे पालिका क्षेत्रातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या भूमिकेला साखळीतील मुस्लिम बांधव किती समर्थन देतात, हे बघावे लागेल. पंचायतीत मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व दिसत आहे. त्यात सगलानी बदल घडवतात का,हे पहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT