Assagao, Journalists Dainik Gomantak
गोवा

Assagao Panchayat: परिवर्तनासाठी पत्रकारांचे योगदान मोठे; आसगावात पत्रकारांचा सत्कार

Journalist Felicitation: पत्रकारांचा श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या पद्धतीने स्वातंत्रसैनिकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ब्रिटिशांविरोधात लढा देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच धर्तीवर आज देशभरातील पत्रकार देशात वैचारिक तसेच मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटत आहेत. राज्यकर्त्यांची वेळोवेळी कान उघडणी करत शासन पद्धतीवर अंकुश ठेवून आहेत, असे आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंचायत कार्यालयात आयोजित बार्देश तालुक्यातील पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सोनिया क्षीरसागर नाईक, आश्विनी पोर्खे, व्यंकटेश गोवेकर, राघोबा कांबळे व तनया गांवकर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार गिरीश मांद्रेकर, संतोष गोवेकर, जयेश नाईक, प्रीतेश गारुडी, योगेश मिराशी, उमेश झर्मेकर, अर्पिता श्रीवास्तव तसेच व्हिडिओ जर्नलिस्ट नितीक्षा गांवकर, रेणुका तांळगांवकर, स्नेहा बडीगेर, स्नेहा हसोटीकर, वीणा मांद्रेकर, सौरव शिरोडकर, श्याम फडते, प्रकाश गडेकर, सागर लवंदे, साईप्रसाद कुबडे, कमलाकर हुम्रसकर, एम. शेख यांचा शाल, श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

तसेच शिक्षिका ज्योती मयेकर, स्नेहा गांवस, अंकुश पाळणी तसेच जैव संवर्धन समितीच्या सदस्या सायोनारा डान्टास काव्द्रुस यांनाही पंचायत मंडळाकडून गौरविण्यात आले. मुणांगवाडा येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत तसेच स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT