Goa Roads: सरकारला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने  रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती व पॅचअप करण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे
Assagao RoadDainik Gomantak

Assagao Road: रस्त्यांचे भाग्य उजळले! दुरुस्ती, खड्डे बुजवण्यास सुरवात

Goa Roads: सरकारला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती व पॅचअप करण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे
Published on

पणजी: आसगाव-म्हापसा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत दोन आठवड्यांपूर्वी श्याम गोवेकर या बस चालकाने आसगाव पंचायतीसमोर पाण्याने भरलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बसून तीव्र आंदोलन केले. त्यानंतर सरकारला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे जेटपॅचर मशिन वापरून बुजविण्याची तसेच दुरुस्ती व पॅचअप करण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे.

राज्यातील रस्त्यांची झालेली चाळण पाहून सर्व ठिकाणांहून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. शासन रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याने रस्ता खराब होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्यांचा त्रास केवळ वाहनचालकांनाच होत नाही तर पादचाऱ्यांना देखील होत आहे. लोकांनी आक्रोश केल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी खराब झालेल्या रस्त्यांची गंभीर दखल घेत खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा संबंधितांना दिला.

सरकार अनेकदा विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याची घोषणा करून लोकांना याची माहिती देते, मात्र पहिल्याच पावसात सरकारच्या खर्चांवर पाणी पडते. उत्तम दर्जाचे साहित्य विकासकामांसाठी वापरले जात नाही. त्यामुळे सरकारच्या क्षमतेवर प्रश्माचिन्ह उपस्थित न होता कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतात.

Goa Roads: सरकारला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने  रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती व पॅचअप करण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे
Assagao: रस्ते दुरुस्त करा अन्यथा बेमुदत उपोषण! खासगी बसमालकांना स्थानिकांचा पाठिंबा

‘रस्त्यांवरून कळतो राज्याचा विकास’

शिक्षक सुकाजी नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्य सरकार विकसित भारत विकसित गोवाच्या गोष्टी करते, पण खऱ्या अर्थाने राज्य विकसित आहे की नाही हे रस्ते दाखवून देतात. पर्यटक गोव्यात आल्यावर ते रस्त्यांवरून वाहन चालवतात, त्यामुळे त्यांना वाहन चालविताना त्रास झाल्यास ते सरकारलाच जबाबदार धरणार. त्यांच्या मनावर गोव्याबद्दल चांगले संस्कार करण्यासाठी रस्ते उत्तम पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com