Goa Assagao House Demolition Case Canva
गोवा

Goa Assagao: पूजा शर्माच्या जामिनावर आज निर्णय होणार; पोलिसांच्या तपासाची रूपरेषा ठरणार

Assagao House Demolition Case: घर पाडण्यामागील मुख्य सूत्रधार पूजा शर्माच असल्याचा पोलिसांचा दावा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय प्रधान सत्र न्यायालयात उद्या १० जुलैला होणार आहे. त्यामुळे या निर्णयावर पोलिसांची पुढील तपासकामाची रूपरेषा ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात या घटनेमागील तीच सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी सुनावणीवेळी तिच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केला होता. त्यामुळे या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

आगरवाडेकर कुटुंबीयांनी संशयित पूजा शर्मा व इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी काही बाऊन्सर्ससह आठजणांना अटक केली होती. त्यातील सर्व बाऊन्सर्स जामिनावर सुटले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन वाहने जप्त केली आहेत. त्यातील एका वाहनाची क्रमांकपट्टी बनावट असल्याने वाहनमालकाला अटक केली आहे. हे घर पाडण्यामागील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हीच असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

तिला दोनवेळा चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगूनही ती अनुपस्थित राहिली. पोलिसांचे पथक मुंबईस्थित तिच्या पत्त्यावर जाऊन आले. मात्र, तिला समन्स बजावता आले नव्हते. तिने हे घर असलेली मालमत्ता ख्रिस पिंटो याच्याकडून खरेदी केली असली तरी कायदेशीर प्रक्रिया न करता ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. ही जमीन मिळवून देणारा दलाल संशयित अर्शद ख्वाजा हा सध्या जामिनावर आहे. त्याची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem Market Fire: कुडचडेतील फळ, फूल मार्केट जळून झाले खाक; विक्रेत्यांचे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

Mhadei River Dispute: जलसंपदा खात्याचा सखोल 'गृहपाठ' सुरू, म्हादईप्रश्‍‍नी शुक्रवारी विशेष बैठक; अहवालासाठी तज्ज्ञांची मदत

PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

SCROLL FOR NEXT