Bhumika devasthan ashwem mandrem X
गोवा

Bhumika Temple: भूमिका देवस्थानच्या वर्धापनदिनावरून वाद! तोडगा काढण्याचे प्रयत्न अपयशी; फक्त धार्मिक विधी होणार

Bhumika devasthan ashwem mandrem: श्री भगवती सप्तेशवर पंचायतन देवस्थानच्या अंतर्गत असलेल्या देवस्थान समितीच्या प्रमुखांनी सुदेश सावंत गटाला पूजा करण्यासाठी पत्र दिले.

Sameer Panditrao

मोरजी: आश्वे-मांद्रे येथील भूमिका देवस्थानचा २१ रोजी वर्धापनदिन उत्सव आहे. हा उत्सव कोणी साजरा करावा, यावरून रविवारी सकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी वर्धापनदिन होणार नाही, फक्त धार्मिक विधी पार पडण्याची शक्यता आहे.

श्री भगवती सप्तेशवर पंचायतन देवस्थानच्या अंतर्गत असलेल्या देवस्थान समितीच्या प्रमुखांनी सुदेश सावंत गटाला पूजा करण्यासाठी पत्र दिले. त्याला दुसऱ्या गटाने हरकत घेतली. त्यामुळे पोलिसांना व मामलेदारांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दिवसभर चाललेल्या वादात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पेडणे मामलेदार अनिल राणे, मांद्रेच्या पोलिस निरीक्षकांनी वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले.

मामलेतदार अनिल राणे, पोलिस निरीक्षक नाईक यांना याची माहिती देण्यात आली. मामलेदारांनी आश्वे-मांद्रे येथील श्री भूमिका देवस्थानमध्ये वर्धापनदिनावरून झालेल्या वादात मामलेदार व पोलिसांनी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. कोणीच येथे उत्सव साजरा करू नये. ज्यांना पूजेचा अधिकार दिला आहे, त्यांनी दैनंदिन पूजा करावी.

परंतु इतर उत्सव करू नये, अशी सूचना सुदेश सावंत गटाला केली. त्यानंतर हा गट मंदिरातून निघून गेला. मात्र, दुसऱ्या गटाने मंदिरातच ठाण मांडून काही भक्त विधिवत पूजा करण्यासाठी येणार आहेत, असे सांगितले. त्यामुळे गर्भकुडीचा दरवाजा बंद न करता तो खुला ठेवावा, अशी मागणी मामलेदार, पोलिसांकडे केली. मात्र, ही सूचना अमान्य करण्यात आली. दुसऱ्या गटाने, केवळ काही महाजन, भक्त पूजेसाठी येणार आहेत. त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा. त्यासाठी दरवाजा उघडा ठेवावा अशी मागणी केली. मामलेदार अनिल राणे यांनी ही विनंती मान्य केली.

२१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणारा वर्धापनदिन साजरा होणार नाही, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. याविषयी सुरेश सावंत गटाने प्रतिक्रिया देताना उद्या आम्ही जे सकाळी देवपूजा, अभिषेक केला जाईल. मात्र इतर उत्सव, वर्धापनदिन करण्यात मनाई असल्यामुळे ते आम्ही करणार नाही, असे त्यांनी सांगितले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT